• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

ठाणेकरांच्या वेगवान,सुलभ प्रवासासाठी रिंग मेट्रो प्रकल्प आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दिल्ली भेटीत मुख्यमंत्र्यांकडून ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 7, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वाढते शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. मुंबई सोबतच ठाणेवासियांना देखील वेगवान आणि सुलभ प्रवासासाठी मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ‘ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प’ काळाची गरज असल्याचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय शहरे विकासमंत्र्यांसमोर मांडला. नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह मंत्रालयाने आयोजित केलेल्या बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी केंद्रीय शहरे विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांची भेट घेतली. सामान्य नागरिकांना सार्वजनिक दळणवळणाची सुविधा आरामदायी आणि गतिमान आवश्यक आहे या तळमळीतून मुख्यमंत्री श्री. शिंदे दिल्ली भेटीत त्यांनी ठाणेकरांसाठी रिंग मेट्रो प्रकल्प किती गरजेचा आहे, हे सांगितले. याभेटीत महाराष्ट्राच्या नागरी भागातील विविध मूलभूत आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली. ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा करताना मेट्रो कोचची संख्या वाढवावी अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

विज्ञान भवनातील डाव्या विचारसरणीमुळे निर्माण झालेल्या उग्रवादाच्या परिस्थितीबाबतची बैठक आटोपून मुख्यमंत्री श्री. शिंदे लगेचच केंद्रीय शहरे विकास मंत्री श्री. पुरी यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित होते. महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे सहकार्य लाभत आहे. त्यामुळे हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या भेटीत मुख्यमंत्र्यांची केंद्रीय मंत्र्यांसमवेत ठाणे मेट्रोविषयी सविस्तर चर्चा झाली. ठाणे शहरात सध्या दोन मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. शहराचा विस्तार होत असून तसेच शहर-जिल्ह्याची लोकसंख्या वाढत आहे. ठाण्यातील एकाच रेल्वे स्थानकावरुन ७ ते ८ लाख प्रवाशांची वर्दळ आहे. त्यामुळे २९ किमी लांबीचा ठाणे रिंग मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल मान्यतेसाठी केंद्राला सादर केला असून त्याला मान्यता द्यावी, अशी मागणी करतानाच मेट्रो कोचची संख्या वाढविण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. सद्यस्थितीत आणि भविष्याच्या दृष्टीने मेट्रो कोच वाढविणे आवश्यक आहे. रिंग मेट्रोच्या प्रकल्प अहवालाला मान्यता देतानाच मेट्रो कोचची संख्या वाढवावी या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीवर केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली. महाराष्ट्रातील नागरी भागात सुरु असलेल्या विविध प्रकल्पांविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.

एकूण २९ किमी लांबीच्या या प्रकल्पात २६ किमी लांबीचा मार्ग हा इलेव्हेटेड असून ३ किमीचा मार्ग हा भूमिगत आहे. प्रकल्पांर्गत एकूण २२ स्थानके असून त्यातील दोन स्थानके भूमिगत असणार आहेत. त्यातील एक भूमिगत स्थानक ठाणे रेल्वे स्थानकाला जोडले जाणार आहे. अन्य स्थानके शहरातील मेट्रो कॉरिडॉरला जोडली जाणार आहेत.

Previous Post

अंतिम सामन्यात जपानचा पराभव करत; आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकीत भारताला सुवर्ण पदक

Next Post

मुंबई बंदर प्राधिकरणाच्या जागेवरील गाळेधारकांच्या समस्यांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई बंदर प्राधिकरणाच्या जागेवरील गाळेधारकांच्या समस्यांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION