• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

FDA अधिकारी असल्याचा बनाव करून दुकानदारांची लूट; नवी मुंबईत सहा जणांच्या टोळीला अटक

admin by admin
November 18, 2026
in गुन्हेगारी, नवी मुंबई, महाराष्ट्र
0
FDA अधिकारी असल्याचा बनाव करून दुकानदारांची लूट; नवी मुंबईत सहा जणांच्या टोळीला अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : सरकारी यंत्रणेचा धाक दाखवत दुकानदारांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश एपीएमसी पोलिसांनी केला आहे. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) अधिकारी असल्याचे भासवून गुटखा विक्रीप्रकरणी कारवाईची धमकी देत दुकानदारांना लुटणाऱ्या या टोळीतील सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. बनावट ओळखपत्रे, मनसेचा झेंडा लावलेली इनोव्हा क्रिस्टा कार आणि बनावट छाप्यांच्या माध्यमातून आरोपी दुकानदारांवर दबाव टाकत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात कोपरी येथील पानटपरी व्यावसायिक अभिलाष पांडे यांना कारमध्ये डांबून मारहाण करत त्यांच्याकडून तब्बल २ लाख ६६ हजार रुपये उकळण्यात आले होते. पोलिसांनी आरोपींकडून संपूर्ण रक्कम जप्त केली असून गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा क्रिस्टा कारही ताब्यात घेतली आहे. प्रशांत शिंदे, सत्येंद्र रस्तोगी, अथर्व भोसले, प्रथमेश गायकर, अंकुश पवार आणि उमेश कोडगमुन्ना अशी अटक आरोपींची नावे आहेत. यापैकी प्रथमेश गायकर हा रिक्षाचालक, तर अंकुश पवार हा टॅटू कलाकार असून, दोघांकडे ‘फूड अँड ड्रग्स कन्झ्युमर वेल्फेअर कमिटी’च्या नावाची बनावट ओळखपत्रे होती. त्यांचा वापर करून आरोपी स्वतःला एफडीए अधिकारी म्हणून दुकानदारांची तपासणी करत असल्याचा बनाव करत होते. गुटखा विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी केली जात होती.

४ नोव्हेंबर रोजी आरोपींनी अभिलाष पांडे यांच्या घरी जाऊन एफडीए अधिकारी असल्याचे सांगत झडतीचा बनाव केला. त्यानंतर त्यांना इनोव्हा कारमध्ये बसवून कोपरी, कोपरखैरणे आणि घणसोली परिसरात फिरवत गुटखा विक्रीच्या आरोपाखाली अटक करण्याची धमकी दिली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या मोबाईलद्वारे विविध यूपीआय खात्यांमध्ये १ लाख ८६ हजार रुपये वर्ग करून घेण्यात आले. यानंतर एका आरोपीने पांडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीला धमकावत आणखी ८० हजार रुपये रोख घेतले. या घटनेनंतर १३ नोव्हेंबर रोजी पांडे यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सहाही आरोपींना अटक केली. तपासात आरोपींमध्ये पेट्रोल पंप कर्मचारी, कॉल सेंटर कर्मचारी, बसचालक तसेच रिक्षाचालकाचा समावेश असल्याचे समोर आले असून, काही रक्कम पेट्रोल पंपावरील स्कॅनरद्वारे वळवण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे. आरोपींपैकी एकजण पूर्वी मनसेचा पदाधिकारी असल्याची माहिती मिळाली असली, तरी पक्षाचा या गुन्ह्याशी कोणताही अधिकृत संबंध असल्याचे समोर आलेले नाही. या टोळीने यापूर्वीही अशाच प्रकारे दुकानदारांना लक्ष्य केले असण्याची शक्यता तपासली जात असून, संशयास्पद व्यक्ती सरकारी अधिकारी असल्याचा दावा करत घरात किंवा दुकानात आल्यास त्यांच्या ओळखपत्रांची खातरजमा करून तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी केले आहे.

Previous Post

दिव्यात तुकाराम मुंडे यांच्या घरावर मध्यरात्री ८ ते १० जणांचा दरोडा; मुंब्रा पोलिसांकडून तपास सुरू!

Next Post

सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार; गॅस सिलिंडरमागे १५० रुपये कमिशनची मागणी

admin

admin

Next Post
सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार; गॅस सिलिंडरमागे १५० रुपये कमिशनची मागणी

सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार; गॅस सिलिंडरमागे १५० रुपये कमिशनची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (68)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,157)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (509)
  • नवी मुंबई (221)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (79)
  • पालघर (52)
  • पुणे (1,091)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,325)
  • मुंबई (3,662)
  • रत्नागिरी (66)
  • राजकीय (292)
  • रायगड (68)
  • राष्ट्रीय (598)
  • वसई-विरार (74)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (224)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION