मुंबई : मुंबईतील प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. पॉड टॅक्सीच्या उद्घाटनाची तारीख समोर आलेली आहे. पॉड टॅक्सी ही कुर्ला ते वांद्रा स्थानकादरम्या धावणार असून वाढत्या वाहतूक कोंडीवर मोठा उपाय ही सेवा ठरणार आहे. वाढत्या शहरीकरणामुळे प्रवाशांना दररोज मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी खूप प्रवा करावा लागतो. त्यामुळे बऱ्याचदा कामाच्या वेळेतच ट्राफिकची समस्या येते. त्यामुळे वाहतूकीवरील ताण कमी करण्यासाठी पॉड टॅक्सी सुरु होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या ३ एप्रिल रोजी याचे उद्घाटन केले जाणार असून त्यानंतर ही पॉड टॅक्सी प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. पॉड टॅक्सीचा फायदा कुर्ला ते वांद्रे दरम्यान दररोज येणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. पॉड टॅक्सी ही पूर्णपणे ऑटोमेटेड इलेक्ट्रिक व्हेहईकल आहे. एका टॅक्सीत एका वेळीत साधारण ८ प्रवासी बसू शकतात आणि उभे राहून १३ प्रवासी प्रवास करु शकतात. वांद्रे किंवा कुर्ला स्थानकावरून बीकेसीमध्ये जाण्यासाठी सध्या रिक्षा किंवा बसने खूप वेळ लागतो, पॉड टॅक्सीमुळे हा प्रवास जलद होईल. दर १५ ते ३० सेकंदांनी एक टॅक्सी उपलब्ध असेल, ज्यामुळे प्रवाशांना थांबण्याची गरज भासणार नाही. सर्वेक्षणांनुसार, याचे भाडे साधारणपणे २१ रुपये प्रति किमी असण्याची शक्यता आहे.
प्रस्तावित प्रमुख पॉड टॅक्सी स्थानके :
- कुर्ला रेल्वे स्थानक(सुरुवात/कुर्ला सबर्बन)
- NSE जंक्शन
- BKC कनेक्टर
- MCA (मुंबई क्रिकेट असोसिएशन)
- US कॉन्सुलेट
- जिओ वर्ल्ड सेंटर(Jio World Centre)
- ONGC बिल्डिंग
- गोदरेज BKC
- भारत डायमंड बोर्स(Bharat Diamond Bourse)
- SEBI
- NSE (नॅशनल स्टॉक एक्सचेंज)
- फॅमिली कोर्ट
- कलानगर जंक्शन
- वांद्रे टर्मिनस/स्थानक(शेवट)







