नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर दोहा-नागपूर विमानाने आलेल्या एका प्रवाशाकडून ५ किलो ‘हायड्रोपोनिक मारिजुआना’ नावाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या मालाची किंमत ५ कोटी रुपये आहे. बँकॉकमधून हे ड्रग्ज आणले होते.
डीआरआय आणि कस्टमच्या विशेष इंटेलिजन्स आणि इन्वोस्टिगेटिंग शाखेने ही कारवाई केली. न्यायालयाने आरोपीची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. हे ड्रग्ज चरस, गांजा पेक्षाही अधिक प्रभावी असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक दिवसानंतर मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याने या ड्रग्जच्या तस्करीची आंतराष्ट्रीय साखळी शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे थायलंड, उइस्बेकिस्तान आणि सौदी अरब अशा तीन देशातून मोकाटपणे फिरत आल्यावर त्याला नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेण्यात आले.







