पुणे : तरुणाच्या आईचे गेल्या वर्षी निधन झाले. महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळात तरुणाच्या आईची बांधकाम मजूर म्हणून नोंद आहे. तक्रारदाराच्या आईचा कामगार विमा म्हणून दोन लाख ३४ हजार रुपये मिळणार होते. कामगार कार्यालयाकडून ही रक्कम मिळवून देण्यासाठी शेंडगे हिने तरुणाकडे एक लाख रुपयांची मागणी केली. तरुणाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
या प्रकरणी कामगार विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करणाऱ्या दोन दलालांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून पकडले. या दोघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फारूख हनिफ पठाण (वय ५६, रा. बोपोडी) आणि योगिता अरुण शेंडगे (वय ४०, रा. थेरगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अधिक तपास पोलीस करीत आहेत.