• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मज्जा पडली महागात! वंदे भारतवर दगडफेक करणारा तरुण गजाआड; आधारवाडी जेलमध्ये रवानगी

admin by admin
March 14, 2026
in गुन्हेगारी, ठाणे
0
मज्जा पडली महागात! वंदे भारतवर दगडफेक करणारा तरुण गजाआड; आधारवाडी जेलमध्ये रवानगी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसवर ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ दगड फेकणाऱ्या एका तरूणाला रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी तात्काळ अटक केली. एक्सप्रेसच्या खिडकीच्या काचांचे यात नुकसान झाले. दगडाच्या तडाख्याने खिडकीच्या काचांच्या ठिकऱ्या उडाल्या आणि त्या काही प्रवाशांना लागल्या. ही माहिती प्रवाशांनी तातडीने रेल्वे नियंत्रण कक्षाला दिली. कल्याण आणि डोंबिवली रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी तात्काळ पत्रीपूल ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान शोध मोहीम राबवून एका तरूणाला अटक केली. रेल्वेवर दगडफेकीच्या घटना गेल्या काही काळात वाढल्याने रेल्वे प्रवासी व रेल्वे प्रवासी संघटनांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

सनी कांबळे (२३) असे या तरूणाचे नाव आहे. तो मुळचा पुण्यातील शुक्रवार पेठ भागात राहणार आहे. त्यांला गांजा सेवनाचे व्यसन आहे. शुक्रवारी सीएसएमटी – साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ठाकुर्ली रेल्वे स्थानकाकडून कल्याणच्या दिशेने धावत होती. यावेळी ठाकुर्ली रेल्वे स्थानक भागात रेल्वे मार्गातून अचानक दगडी एक्सप्रेसच्या काचेवर आदळल्या. खिडकीजवळ बसलेले प्रवासी अचानक या फटक्याने घाबरले. काचेच्या ठिकऱ्या काही प्रवाशांच्या अंगावर उडाल्या. यामध्ये कोणी जखमी झाले नाही. घडल्या घटनेने एक्सप्रेस डब्यात गोंधळ उडाला. एक तरूण रेल्वे मार्गात आपण एक्सप्रेसवर दगड फेकल्याचा आनंद आणि एक्सप्रेस सोबत स्वताच्या मोबाईलमधून सेल्फी काढत असल्याचे प्रवाशांना दिसले. त्यानंतर तो तरूण रेल्वे मार्गातून पळून गेला. जागरूक प्रवाशांनी तातडीने मध्यवर्ति रेल्वे नियंत्रण कक्षाला संपर्क करून घडल्या घटनेची माहिती दिली. रेल्वे सुरक्षा बळाचे जवान आणि कल्याण, डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस तातडीने पत्रीपूल ते ठाकुर्ली दरम्यान दाखल झाले. त्यांनी एक्सप्रेसवर दगड फेकणाऱ्या इसमाचा शोध सुरू केला. त्यांना ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील वस्तीत तुलसी इमारतीजवळ एक संशयास्पद तरूण आढळला. पोलिसांना पाहताच तो पळू लागला आणि घाबरला. हाच तो तरूण असावा संशय घेऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने आपले नाव सनी कांबळे असल्याचे सांगितले. आणि पोलिसांनी त्याला फैलावर घेताच त्याने आपण वंदे भारत एक्सप्रेसवर दगड फेकल्याची कबुली पोलिसांना दिली. रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले. कल्याण रेल्वे सुरक्षा बळ पोलीस ठाण्यात त्याच्यावर रेल्वे सुरक्षा कायद्याच्या १५३, १४७ अन्वये गुन्हा दाखल केला. त्याला तातडीने रेल्वे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. पोलिसांनी त्याची रवानगी आधारवाडी तुरूंगात केली. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक संदीप पाटील करत आहेत.

Previous Post

BMC चा मोठा दणका! मुंबईतील ३.६१ लाख विद्यार्थ्यांच्या मोफत शालेय साहित्यांची निविदा प्रक्रिया रद्द

Next Post

एक्स्प्रेस वेवरील ट्रॅफिक जॅमचा ‘THE END’! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ६ नवीन बोगद्यांची MSRDC ची घोषणा

admin

admin

Next Post
एक्स्प्रेस वेवरील ट्रॅफिक जॅमचा ‘THE END’! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ६ नवीन बोगद्यांची MSRDC ची घोषणा

एक्स्प्रेस वेवरील ट्रॅफिक जॅमचा 'THE END'! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ६ नवीन बोगद्यांची MSRDC ची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,353)
  • मुंबई (3,067)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION