पुणे : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांचे तर्फे पोलीस आयुक्त श्री विनय कुमारजी चोबे यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेने श्री मोरया पुरस्कार ही स्पर्धा पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे हद्दीतील गणेशोत्सव मंडळांसाठी जाहीर करण्यात आली आवश्यक ते निकष पूर्ण करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांची परिमंडलनिहाय स्पर्धा आयोजित करून निश्चित केलेले निकष पूर्ण करणाऱ्या व समाज उपयोगी कार्यात सहभाग घेणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना आयुक्तालयाचे वतीने श्री मोरया पुरस्कार २०२४ चे वितरण करण्यात येते. पिंपरी चिंचवड आयुक्तालय परिमंडळ १ चें अंतर्गत येणाऱ्या गणेशोत्सव मंडळाचे परीक्षण करण्यात आले होते.
परिमंडल एक स्तरावरील परीक्षण करण्याकरता नेमण्यात आलेल्या परीक्षकांचा प्रमाणपत्र देऊन दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांचे हस्ते सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी प्रास्ताविक केले परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले व गतवर्षी प्रमाणेच याही वर्षी निरपेक्ष भावनेने समतोल राखत परीक्षणाचे कार्य करावे असे आवाहन केले उपस्थित सर्व परीक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आल्यानंतर सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र कोळी आणि पिंपरी पोलीस स्टेशन चें अशोक कडलग यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. परिमंडल एक यांचे तर्फे परीक्षण समितीतील (१) धनंजय मधुसूदन कुलकर्णी (२) सुभाष दगडू मालुसरे (३) शिवदास नारायण महाजन (४) रामकिसन नानक सैगल (५) हरीश बाजीराव डोळस (६) सुखानंद राम कांबळे (७) क्षितिज विजय कोंढरे (८) बशीर सुतार (९) हरीश कदम (१०) सुरज पांढरे (११) चेतन शिंदे या सर्वांचा गुलाबपुष्प आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अंकुश बांगर यांनी सर्वांचे आभार मानले चिंचवड एल.आय.बी. चें सागर आढारी व श्री संतोष उभे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.







