वृत्तसंस्था : भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरला सिडनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्रेयस अय्यरला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान मैदानावर गंभीर दुखापत झाली होती, त्यानंतर आता श्रेयस अजूनही आयसीयूमध्येच असल्याची माहिती समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अय्यरला दुखापत झालेल्या ठिकाणी अंतर्गत रक्तस्त्राव होत आहे. अहवालानुसार त्याला पाच ते सात दिवस रुग्णालयात राहावं लागू शकते. श्रेयसला झेल टिपताना मैदानावर दुखापत झाली होती आणि ही दुखापत गंभीर आहे. श्रेयस अय्यरला खबरदारी म्हणून अजूनही आयसीयुमध्ये ठेवलं आहे. श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत भारतीय क्रिकेट व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतेही अपडेट देण्यात आलेले नाहीत. वृत्तानुसार, श्रेयस गेल्या दोन दिवसांपासून आयसीयूमध्ये आहे. अंतर्गत रक्तस्त्रावामुळे संसर्ग होण्याची भीती असल्याने अय्यरला आयसीयूमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढच्या ४८ तासात त्याचा रक्तस्त्राव नाही थांबला तर अजून काही दिवस त्याला आयसीयुमध्येच ठेवण्यात येईल. त्याच्या रुग्णालयात राहण्याचा कालावधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यावर अवलंबून असेल. श्रेयस सुमारे एक आठवडा रुग्णालयात राहील अशी अपेक्षा आहे.







