पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलाने दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावात अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. एक चिकन सेंटरच्या नावाखाली अवैधरित्या गांजाची विक्री सुरु होती. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सलीम आदम शेख असे आहे.
पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली असून पोलिसांना तब्बल १ किलो ३८३ ग्रॅम वजनाचा विक्रीस बंदी असलेला गांजा आढळून आला आहे. बाजारभावानुसार जप्त करण्यात आलेल्या या गांजाची अंदाजित किंमत २० हजार ७४५ रुपये इतकी आहे. पोलिसांनी हा संपूर्ण गांजाचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे चालवत मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांना संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे.







