मुंबई : अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात २८ जानेवारी रोजी निधन झालं. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार घेणार आहेत. त्यासाठी राजभवन सज्ज झालं आहे. राजभवनात काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा सोहळा होणार आहे. शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या पहिल्या महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत.
सुनेत्रा पवार यांनी विधिमंडळात जाऊन अजित पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या फोटोचं दर्शन घेतलं. सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाली आहे. प्रस्ताव मांडल्यानंतर छगन भुजबळ यांच्यासह इतर काही आमदारांनी अनुमोदन दिले आहे. सुनेत्रा पवार या शुक्रवारी रात्री सहसोग सोसायटीमधून मुंबईत जाण्यासाठी रवाना झाल्या. पहाटे त्या देवगिरीला पोहोचल्या. यानंतर सकाळपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक गोष्टी घडत होत्या. शरद पवार यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत आपल्याला या शपथविधीबाबत कोणतीही कल्पना नसल्याच म्हटलं आहे. यानंतर पार्थ पवार मुंबईहून पुन्हा बारामतीला रवाना झाले. पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात तब्बल १ तास चर्चा झाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून या शपथविधीला कुणीही उपस्थित राहणार नसल्याच म्हटलं आहे. अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालं. हा अपघात इतका भयंकर होता की, त्यामध्ये त्यांचं करुण अंत झाला. पवार कुटुंबासोबतच संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा खूप मोठा आघात होता. अद्याप कार्यकर्ते या दुःखातून सावरले नसताना उपमुख्यमंत्रीपदासाठी शपथविधी घेण्यात येत आहे.







