PUNE: किवळे होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे मनपाला आली जाग; केली २१ होर्डिंग व २३९ प्लेक्स,बॅनरवर कारवाई..
पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील किवळे येथे अनधिकृत होर्डींग पडून ५ जणांचा मृत्यू झाला होता तर तिघे जखमी झाले होते. या घटनेनंतर पुणे पालिकेला जाग आली आहे. अतिक्रमण विभागाने पुणे शहरातील तब्बल अनधिकृत आणि धोकादायक असलेले २१ होर्डींग्स समवेत २३९ हून अधिक फ्लेक्स, बॅनर, बोर्डवर कारवाई करत ते काढण्यात आले आहेत.