पुणे : राज्यात पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत.२३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २०१- बारामती आणि २२३- राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका होणार आहे. यामुळे या मतदारसंघात शासकीय सुट्टी असणार आहे.
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ पोटनिवडणुकीसाठी रोजी मतदान होणार आहे. या मतदार संघातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी बारामती व राहुरी विधानसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जाहीर केली आहे. ज्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत, त्या ठिकाणी सुट्टी असणार आहे. यामुळे शाळा-कॉलेजलाही सुट्टी असणार आहे. तरुणांनी मतदान करावे, यासाठी ही सुट्टी असणार आहे. ही सार्वजनिक सुट्टी २०१- बारामती विधानसभा मतदारसंघ आणि २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या नागरिकांसाठी आहे. या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच ही अधिसूचना राज्य व केंद्र शासनाचे कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम इतर प्रतिष्ठान यांनाही लागू राहील, असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे २३ एप्रिलला प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.






