वृत्तसंस्था : दशावतार या सिनेमाने २०२५ हे वर्ष गाजवलं. बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई तर केलीच, शिवाय अमराठी प्रेक्षकांनाही या चित्रपटाने आकर्षित केलं होतं. एवढंच नव्हे तर मल्याळण भाषेतही हा सिनेमा रीलिज करण्यात आलेला. २०२५ या वर्षात मराठी सिनेविश्वात एकापेक्षा एक विक्रम रचणाऱ्या ‘ दशावतार ‘साठी २०२६ हे वर्षही खूपच खास ठरणार आहे. सिनेमाचा दिग्दर्शक सुबोध खानोलकर याने एक आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. प्रत्येक मराठी चित्रपटासाठी आणि सिनेप्रेमींसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
‘दशावतार’ या सिनेमाची ऑस्करच्या म्हणजेच अकॅडमी अवॉर्ड्सच्या मुख्य स्पर्धेत निवड झाली आहे. सुबोधने शेअर केलेल्या पोस्टनुसार, मुख्य स्पर्धेच्या श्रेणीत निवडला गेलेला हा पहिलाच सिनेमा आहे. जगभरातून या श्रेणीसाठी १५०हून अधिक चित्रपट निवडले गेले आणि त्यामध्ये ‘दशावतार’नेदेखील बाजी मारली. तसेच सुबोधने याविषयीही आनंद व्यक्त केला की, अकॅडमी स्क्रीनिंग रुममध्ये दाखवला जाणारा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.






