मुंबई : ट्रॉम्बे आणि गोरेगाव परिसरात चालणाऱ्या २ वेगवेगळ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी २ महिलांसह एका दलालास पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी ७ तरुणींची सुटका करून त्यांची रवानगी महिला सुधारगृहात केली आहे. पहिल्या कारवाईत ट्रॉम्बे परिसरात राहणारी महिला आरोपी प्रियांका ही सेक्स रॅकेट चालवत असून, मागणीनुसार काही तरुणींना विविध हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसमध्ये वेश्याव्यवसायासाठी पाठवित असल्याची माहिती ट्रॉम्बे पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर पोलिसांनी बोगस ग्राहकांच्या मदतीने प्रियांकाला संपर्क साधला होता. ठरल्याप्रमाणे प्रियांका ४ तरुणीसोबत तिथे आली होती. याच दरम्यान पोलिसांनी तिथे कारवाई करुन प्रियांकासह इतर तरुणींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यानंतर प्रियांकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तिला अटक केली. दुसऱ्या कारवाईत बांगुरनगर पोलिसांनी कनिका नावाच्या एका ६२ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेसह दलाल नरेशकुमार बेचेन दांगी या दोघांना अटक केली, तर तीन तरुणींची सुटका केली. कनिका ही गोरेगाव परिसरात राहत असून, ती तिच्या राहत्या घरी सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे बोगस ग्राहक पाठवून त्याची शहानिशा केली होती.यानंतर बंगुर नगर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक करत तरुणींची सुटका केली





