वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारच्या तरुणांना मोठं गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान मोदींनी आज युवा संवाद कार्यक्रमाद्वारे तरुणांशी संवाद साधला आहे. हा कार्यक्रम ऑनलाइन होता. या माध्यमातून त्यांनी बिहारमधील हजारो तरुणांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जवळपास ६२,००० कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. याचसोबत अनेक योजना देखील लाँच केल्या.
पंतप्रधान मोदींनी तरुणांसाठी नवीन योजना सुरु केली आहे. मुख्यमंत्री स्वयं सहात्ता भत्ता योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना दर महिन्याला १००० रुपये दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत पाच लाख तरुणांना दर महिन्याला आर्थिक मदत केली जाणार आहे. दोन वर्षांसाठी हे पैसे दिले जाणार आहेत. याचसोबत त्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षणदेखील दिले जाणार आहे. बेरोजगार तरुणांसाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे.







