पुणे : देशभरात लव्ह जिहाद, हिंदू-मुस्लिम मुद्द्यांवरून राजकारण तापलं आहे. दिवसेंदिवस दोन समाजातील तणाव वाढत चालला आहे. या सगळ्यात पुण्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे विवाहितेवर तिच्या नणंदेसह एका धर्मगुरूने जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेचा आरोप आहे की, धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने नणंदेने तिच्यावर मारहाण केली, तर धर्मगुरूंनी धमकी दिली. या प्रकाराने त्रस्त होऊन संबंधित महिलेनं अखेर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी पोलिस ठाण्यात नणंदेसह धर्मगुरूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय पीडित विवाहित महिलेवर तिच्या नणंदेने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दहाव टाकत गोती. ज्यावेळी महिलेने धर्मांतरास नकार दिला त्यावेळी महिलेला जबर मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर नणंदेनं महिलेला शिवीगाळही केली. पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, १९ वर्षीय पीडित महिलेच्या नणंदेनं विवाहितेवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला होता. जेव्हा विवाहित महिलेनं नकार दिला, तेव्हा महिलेला मारहाण करण्यात आली होती. तसेच नणंदेनं शिवीगाळ केली. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, फ्रान्सिस नावाच्या धर्मगुरूने तिला जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त केले. “मी बाटलीतून आणलेले पाणी तू प्यायले नाहीस… धर्म स्वीकारला नाहीस, तर तुझ्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली जाईल,” अशी धमकी त्याने दिल्याचं महिलेनं आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. तसेच, नणंदेकडूनही शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. वारंवार धर्मांतरासाठी दबाव येत असल्याने त्रस्त होऊन महिलेने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.







