पुणे : पुणे ग्रामीण मधील खेड शिवापूर परिसरातील एका इमारतीत सुरु असलेल्या मोठ्या प्रमाणावर जुगार अड्ड्यावर राजगड पोलीस ठाणे यांनी छापा टाकत तब्बल १७ जणांना अटक केली आहे. या कारवाईत एकूण २८,३०० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहेत. संबधित कारवाई २० जून २०२५ रोजी संध्याकाळी अंदाजे ५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. खेड शिवापूर गावच्या हद्दीत पुणे सातारा हायवेलगत असलेल्या हॉटेल गार्गी शेजारील एका इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात असून काही संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी धाड टाकली आणि १७ आरोपींना रंगेहाथ पकडले.
या कारवाईमध्ये मकरंद दत्ता मेदने (वय २९) – मजुरी, सिंहगड रोड, माणिकबाग अमित उर्फ गोपळ शिवाजी चिकुदरे (वय ३९) – मजुरी, बिबवेवाडी, वैभव सुभाष थोपटे (वय २७) – नोकरी, सिंहगड रोड, ज्ञानेश्वर गजानन बालपांडे (वय ३२) – चालक, धायरी फाटा, विठ्ठल बाळू दारवटकर (वय २९) – शेती, पर्वती जनता वसाहत, विनायक राम चित्ते (वय ५२) – दुकान, गुरुवार पेठ, गोकुळ वामन धोबी (वय ४६) – मजुरी, सध्या रा. खेड शिवापूर, अनिल शशीराव माने (वय ४१) – मजुरी, हडपस,र फारूक याकुब शेख (वय ३९) – मजुरी, सध्या रा. खेड शिवापूर, लखण महादेव बसटे (वय ३४) – मार्केट यार्ड, सुखसागर नगर, राजकुमार केरबा शिखरे (वय ४८) – नोकरी, खेड शिवापूर, सलीम शाकीर शहा (वय ३०) – कापड दुकान, सध्या रा. खेड शिवापूर. शब्बीर शेख याकुब (वय ४४) – दुकान, सध्या रा. खेड शिवापूर, योगेश रकनेश मिस्त्रा (वय ४२) – नोकरी, हडपसर. राकेश रविंद्र राऊत (वय ३२) – नोकरी, वडगाव ब्रु. पंकज प्रकाश गायकवाड (वय ३३) – चालक, वडगाव ब्रु. अमित पांडुरंग राऊत (वय ३६) – नोकरी, कोथरूड. अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या सर्व आरोपींकडून तिन पत्त्यांच्या खेळासाठी वापरलेले पत्ते व त्यांच्याकडील एकूण २८,३०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. प्रत्येक आरोपीकडे १,००० ते ३,००० रुपयांपर्यंत रोकड सापडली. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे खेड शिवापूर व परिसरातील बेकायदेशीर अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणलेत.







