घाटकोपर : घाटकोपरमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोकल ट्रेनमधून उतरताना या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. लोकलमधून उतरताना लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकल्याने या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.
घाटकोपरमध्ये चालत्या रेल्वेतून उतरणाऱ्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. फलाट क्रमांक १ वर ही दुर्दैवी घटना घडली आहे. चालत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न केल्याने तो प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकला. थोड्या वेळाने त्याला आरपीएफच्या जवानांनी बाहेर काढून रूग्णालयात नेले. मात्र त्यावर त्याचा मृत्यू झाला होता.







