नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कदायक घटना समोर आली आहे. नाशिक शहरामध्ये म्हसरूळ परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने रंगाच्या भरात हार्पिक पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आई वडिलांनी लगेच डान्सचा क्लास लावावा यासाठी मुलगी हट्ट करत होती. मात्र क्लास न लावून दिल्याने मुलीने विषारी हार्पिकचा सेवन करून आत्महत्या केली. मुलीवर मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार दरम्यान तिची प्राणज्योत मालवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नाशिक शहरामध्ये म्हसरूळ परिसरात घडली. २७ एप्रिल रोजी एका अल्पवयीन मुलीला क्लास लावायचा होता. त्यामुळे तिने आपल्या आई-वडिलांना डान्स क्लास लावण्याचा हट्ट केला. आई-वडिलांनी त्वरित डान्स क्लास लावून दिला नाही म्हणून मुलीला संताप अनावर झाला होता. संतापाच्या भरात तिने विषारी हार्पिक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयास केला होता. या घटनेनंतर मुलीवर मुंबईच्या के. ई. एम. रुग्णालयात उपचारासाठी पालकांनी दाखल केले होते. तिच्यावर उपचार सुरू असतांना तिची प्राणज्योत मालवली, या प्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांकडून मुलीच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.







