नवी दिल्ली : महिना संपला की वीज बिलाचे टेन्शन सर्वसामान्यांना येतच. मात्र, नागरिकांना या त्रासातून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारची एक मोठी योजना सुरू आहे. ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ असे या योजनेचे नाव असून, याद्वारे तुमचे घरगुती वीज बिल ‘शुन्य’ होऊ शकते. या खास योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजने’ची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत घरांच्या छतावर सोलर पॅनेल लावण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. हे अनुदान सोलर पॅनेलच्या एकूण खर्चाच्या ४०% पर्यंत असू शकते. या योजनेद्वारे देशभरातील १ कोटी घरांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. या योजनेमुळे सरकारचे दरवर्षी अंदाजे ७५,००० कोटी रुपये वाचणार आहेत.
योजनेची मुख्य वैशिष्ट्ये :
- दरमहा मोफत वीज : ३०० युनिटपर्यंत वीज मोफत.
- अनुदान (Subsidy) : १ किलोवॅटसाठी ३०,००० रुपये, २ किलोवॅटसाठी ६०,०००, आणि ३ किलोवॅट किंवा त्याहून अधिक क्षमतेसाठी ७८,००० रुपयांपर्यंत सबसिडी.
- कोणी अर्ज करावा? : ज्यांच्याकडे स्वतःचे छत असलेले घर आहे.
अर्ज कसा करावा?
- अधिकृत वेबसाईटgov.in ला भेट द्या.
- ‘Apply for Rooftop Solar’ वर क्लिक करा.
- तुमचा राज्य, वीज वितरण कंपनी (उदा. MSEDCL/महावितरण), ग्राहक क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून नोंदणी करा.
- फॉर्म भरून सबमिट करा आणि मंजुरी मिळाल्यावर सोलर पॅनेल इन्स्टॉल करा.
या योजनेमुळे विजेचे बिल शून्यावर येऊ शकते आणि विजेची बचतही होईल.







