वृत्तसंस्था : रिलायन्स जिओने आपल्या सेवेला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी ‘हॅपी न्यू इयर २.०’ ही विशेष ऑफर जाहीर केली आहे. २४ नोव्हेंबर २०२६ पासून लागू झालेल्या या ऑफरमध्ये ₹३९९ आणि ₹३,९९९ च्या लोकप्रिय प्लॅनमधील दैनंदिन डेटा मर्यादा पूर्णपणे हटवण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही प्लॅनधारकांना आता 4G आणि 5G नेटवर्कवर खऱ्या अर्थाने अमर्यादित इंटरनेट वापरता येणार आहे.
₹३९९ च्या मासिक प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता, अमर्यादित 4G आणि 5G डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळणार आहे. तर ₹३,९९९ च्या वार्षिक प्लॅनमध्ये ३६५ दिवसांसाठी अमर्यादित 4G व 5G डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतील. या दोन्ही प्लॅन्ससोबत ग्राहकांना १२ महिन्यांसाठी Canva Pro किंवा Pro Lite, JioHotstar (मोबाईल + हॉलीवूड), JioTV वरील FanCode, JioGames आणि ५० जीबी JioAICloud स्टोरेजही विनामूल्य देण्यात येत आहे. याशिवाय, जिओने कमी किमतीचे नवीन 5G ॲड-ऑन आणि नाईट डेटा पॅक्सही सादर केले आहेत. ₹१५ च्या पॅकमध्ये १ दिवसासाठी अनलिमिटेड 5G डेटा मिळणार असून, ₹२५ च्या पॅकमध्ये २ दिवसांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल. तसेच २६ नोव्हेंबर २०२६ पासून उपलब्ध होणाऱ्या ₹५० च्या नाईट डेटा पॅकमध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह दररोज रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत अमर्यादित 4G आणि 5G डेटा वापरता येणार आहे. हे सर्व नवीन प्लॅन्स आणि ॲड-ऑन पॅक्स MyJio ॲप, जिओची अधिकृत वेबसाइट आणि देशभरातील जिओ स्टोअर्सवर उपलब्ध करण्यात आले आहेत. या नव्या ऑफरमुळे जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असून, विशेषतः व्हिडिओ स्ट्रीमिंग, ऑनलाइन गेमिंग आणि वर्क फ्रॉम होम करणाऱ्या वापरकर्त्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

