• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

NHAI चा झटका, फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महागणार

admin by admin
March 16, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
NHAI चा झटका, फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महागणार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : द्रुतगती महामार्गांवरील पथकर नाक्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासह वाहनांचा प्रवास अतिजलद करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) फास्टॅग वार्षिक पास सुविधा १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू केली आहे. या सुविधेला वाहनधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना आता वार्षिक पासच्या दरात एनएचएआयने २.५ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे ३००० रुपयांमध्ये मिळणारा फास्टॅग वार्षिक पास आता १ एप्रिलपासून ३०७५ रुपयांमध्ये मिळणार आहे. त्याचा फटका देशभरातील ५० लाखांहून अधिक पासधारकांना बसणार आहे.

पथकर वसूली अतिजलद, पारदर्शक आणि संगणकीय पद्धतीने व्हावी यासाठी एनएचएआयने फास्टॅग प्रणाली लागू केली. या प्रणालीला चांगला प्रतिसाद मिळत असून पथकर भरणे सोपे झाले आहे. त्यापुढे एनएचएआयने गेल्या वर्षी फास्टॅग वार्षिक पास सुविधा सुरू केली. एनएचएआयच्या देशभरातील द्रुतगती महामार्गांवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि वाहनांचा प्रवास अतिजलद करण्यासाठी ही सुविधा १५ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू करण्यात आली. या वार्षिक पासद्वारे ३००० रुपयांत एनएचएआयच्या महामार्गावरील कोणत्याही पथकर नाक्यांवरून २०० वेळा प्रवास करता येत आहे. पासची वैधता एका वर्षासाठी असली तरी २०० वेळा प्रवास झाल्यास पासची वैधता संपुष्टात येते. असा हा पास आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असल्याने या सुविधेला वाहनधारकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आजच्या घडीला देशभरातील ५० लाखांहून अधिक वाहनधारक फास्टॅग वार्षिक पासचा वापर करतात. मात्र आता त्यांच्या खिशाला काहीशी कात्री बसणार आहे. कारण आता वार्षिक पास महागणार आहे. फास्टॅग वार्षिक पासच्या दरात १ एप्रिलपासून वाढ करण्याचा निर्णय एनएचएआयने घेतला आहे. या निर्णयानुसार २.५ टक्क्यांनी पासदर वाढणार असल्याची माहिती एनएचएआयच्या नागपूरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकसत्ताला दिली. ३००० रुपये असा असणारा पासचा दर १ एप्रिलपासून ३०७५ रुपये असा होणार आहे. याचा फटका ५० लाखांहून अधिक पासधारकांना बसणार असून या राज्यातील पासधारकांचाही मोठ्या संख्येने समावेश आहे. दरम्यान एप्रिल २०२६ ते एप्रिल २०२७ पर्यंत फास्टॅग वार्षिक पाससाठी नवीन दर लागू असतील. तर पास दराचे दरवर्षी एनएचएआयकडून पुनरावलोकन करून दरात सुधारणा केली जाणार आहे. त्यामुळे वार्षिक पासच्या दरात पुढे दरवर्षी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Previous Post

युद्धस्थिती असली तरी विद्यार्थ्यांसाठी ‘खिचडी’ शिजणारच! ३० एप्रिलपर्यंत गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश

Next Post

देशात पुन्हा निवडणुकांचे बिगुल!

admin

admin

Next Post
देशात पुन्हा निवडणुकांचे बिगुल!

देशात पुन्हा निवडणुकांचे बिगुल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION