मुंबई : महापालिका निवडणुकीनंतर महत्त्वाच्या असलेल्या स्थायी समिती, शिक्षण समिती आणि सुधार समितीच्या सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. महापौर रितू तावडे यांनी या समितींच्या सदस्यांच्या नावाची घोषणा केली. त्यानुसार स्थायी समिती आणि सुधार समितीवर २६ जणांची तर शिक्षण समितीवर २२ जणांची निवड करण्यात आली आहे. महापालिकेती पक्षीय बलाबलच्या आधारे या सदस्यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांची निवड करण्यात आली आहे. पालिकेतील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर भाजपचे सर्वाधिक म्हणजे १० सदस्य आहेत. त्या खालोखाल ठाकरेंच्या शिवसेनेचे ७, शिंदेंच्या शिवसेनेचे ४, काँग्रेसचे ३, मनसे आणि एमआयएमचा प्रत्येकी एक सदस्य निवडला गेला आहे.
स्थायी समितीतील सदस्य
भाजप – गणेश दत्ताराम खणकर, प्रभाकर शिंदे, राखी जाधव, मकरंद नार्वेकर, सुरेश झा, शीतल गंभीर, प्रकाश दरेकर, प्रीती साताम, तेजंदर सिंग तेजा, हरीश बांगिर्डे
शिवसेना ठाकरे गट – श्रद्धा जाधव, रमाकांत रहाटे, लक्ष्मी भाटिया, दीपमाला बडे, मीनाक्षी पाटणकर, याशोधर फणसे, जगदीश
शिवसेना शिंदे – अमेय गोळे, यामिनी जाधव, अंजली नाईक, शहीदा खान (एनसीपी)
काँग्रेस – अजंता यादव, अक्षरफ आझमी, ट्युलिप मिरांडा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना – यशवंत किल्लेदार
एमआयएम (MIM) – विजय उबाळे
सुधार समिती सदस्य
भाजप – प्रकाश गंगाधरे, अलका केरकर, शर्मा चित्तरंजन, महादेव शिवगण, दीपक तावडे, स्वप्ना म्हात्रे, अनिश मखवाणी, तेजस्वी घोसाळकर, साक्षी दळवी, संदीप पटेल
ठाकरे शिवसेना – मिलिंद वैद्य, विशाखा राऊत, विठ्ठल लोकरे, सचिन पडवळ, उर्मिला पानचाल, हिरालाला, लोणा रावळ
शिंदे सेना पक्ष – अमेय घोले, संध्या दोषी, किरण लांडगे, अजित रावराणे
काँग्रेस – आश्रफ आझमी, खान मिरज, हैदर मोसीन
एमआयएम – शबाना शेख
मनसे – सुप्रिया दळवी
शिक्षण समिती बिगर सदस्य
भाजप –निखिल व्यास, योजना ठोकळे
ठाकरे गट – प्रियांका राऊत
शिंदे सेना – चंद्रावती मोरे
बेस्ट परिवहन समिती सदस्य
भाजप – आकाश राजपुरोहित, संतोष मेडेकर, रमाकांत गुप्ता, सुनील गणाचार्य, प्रमोद वाकोडे
ठाकरे गट – प्रविणा मोरोजकर, सुनील, नितीन नादगावकर, सुमित अहिर
शिंदे सेना – उपेंद्र सावंत
काँग्रेस – आशा कोपरकर, चंद्रकांत भीमराव मजलीकर
एमआयएम – सैफल खान





