मुंबई : मुंबईकरांची लोकलच्या जीवघेण्या गर्दीतून सुटका होण्याची शक्यता आहे. सध्या वाहतूक कोंडी आणि लोकलमधील गर्दी यामुळं मुंबईकर हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईसह एमएमआरमधील वाहतुकीला चालना देण्यासाठी एमएमआरडीएकडून नऊ मेट्रो मार्गिकांचे जाळे उभारले जात आहे. त्यापैकी चार मेट्र्रो मार्गिका टप्याटप्प्याने सुरू केल्या जाणार आहेत. मुंबईत नुकत्याच झालेल्या धुव्वाधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वेची लोकल सेवा कोलमडलेली असतानाच मेट्रो सेवा मात्र अखंडपणे सुरू होती. परिणामी पुढील चार महिन्यांत चार मेट्रो मार्गिकांचे पहिले टप्पे सुरू केले जाणार आहेत. त्याबाबतचे आवश्यक काम पूर्ण झाले असून, मेट्रोच्या चाचण्या सुरू असल्याची माहिती एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. डिसेंबरअखेर मेट्रो ९ दहिसर पूर्व-काशीगाव, मेट्रो २ बी मंडाळे-डायमंड गार्डन, मेट्रो ४ आणि मेट्रो ४ बी या मार्गिकांची कामे अंतिम टप्प्यात असून डिसेंबरअखेरी प्रवासी सेवेत येण्याची शक्यता आहे. मेट्रो ३ चा अंतिम टप्पा वरळी-कफ परेड हा टप्पाही लवकरच सुरू केला जाणार आहे. सध्या मुंबईत तीन मेट्रो मार्गिका सुरू आहेत. अंधेरी-घाटकोपर, अंधेरी पश्चिम-दहिसर-गुंदवली आणि आरे-वरळी या तीन मेट्रो मार्गिका सुरू आहेत.
मेट्रो ९ दहिसर पूर्व ते काशीगाव – दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेची उभारणी केली जात आहे. मेट्रो ९ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात चार स्थानके असणार आहे. १. दहिसर, २. पांडुरंग वाडी, ३. मिरागाव, ४. काशीगाव अशी स्थानके असणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मेट्रोची लांबी ४.५ किमी इतकी असणार आहे. ही मेट्रो मार्गिका थेट मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ ला कनेक्ट होणार आहे.
मेट्रो २ बी मंडाळे ते डायमंड गार्डन (पहिला टप्पा) – मेट्रो २ बी ही पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारी महत्त्वपूर्ण मार्गिका आहे. पहिल्या टप्प्यामुळं हार्बर मार्गावरील प्रवाशांना फायदा होणार आहे. पहिल्या टप्प्यात मंडाळे, मानखुर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक, डायमंड गार्डन अशी पाच स्थानके असणार आहेत.
मेट्रो ४ आणि ४ए कॅडबरी ते गायमुख (पहिला टप्पा) – ठाणे आणि ठाण्यातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून ही मेट्रो मार्गिका महत्त्वाची आहे. या मेट्रो मार्गिकेची एकूण लांबी ३५ किमी असून पहिल्या टप्प्यात ५.३ किमीपर्यंत धावणार आहे. तर या मेट्रो मार्गिकेवर १० स्थानके असणार आहेत. स्थानके- कॅडबरी, माजीवाडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवनीपाडा, गायमुख
मेट्रो ३ वरळी कफ परेड – मुंबईतील पहिली भुयारी मेट्रोचा हा अंतिम टप्पा आहे. आरे ते कफ परेड असा ही संपूर्ण मेट्रो मार्गिका आहे. वरळी ते कफ परेड या सुमारे नऊ किमीच्या मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून लवकरच ती सेवेत येणार आहे. स्थानके- कफ परेड , विधान भवन , चर्चगेट मेट्रो , हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅण्टरोड , मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी , नेहरू विज्ञान केंद्र, आचार्य अत्रे चौक, वरळी,







