Categories
गुन्हेगारी पालघर

पालघरच्या रिसॉर्टवर अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून गोळीबार

पालघर : पालघरच्या केळवे येथील एका रिसॉर्टवर अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दुर्घटनेत अल्पवयीन मुलगी तेजल शिवराम भिडे ही जखमी झाली आहे. पालघरच्या माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारानंतर जखमी मुलीवर बोईसर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बंदूक दाखवतांना प्रियकराकडून चुकून गोळी लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे. पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. नेमका कसा हा प्रकार घडला? याची माहिती पोलिस घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, बंदूक दाखवताना प्रियकराकडून चुकून गोळी लागल्याची माहिती देण्यात आली आहे. पण हेच नेमकं कारण आहे की आणखी काही वेगळा प्रकार आहे, यासंदर्भातील अधिकचा तपास पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.