नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील कपड्यांच्या दुकानाला सोमवारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत दोन दुकानं आगीच्या विळख्यात सापडल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे.सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकान आगीच्या भक्षस्थानी पडले असून पूर्णतः खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.







