• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची प्रथम क्रमांकावर झेप

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे पुरस्कार प्रदान

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 12, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२३ मध्ये महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील भारत मंडपम मध्ये झालेल्या सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदराज यांनी राज्याच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्री हरदीप सिंह पुरी यावेळी उपस्थित होते. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२३ चे निकाल जाहीर झाले. त्यात महाराष्ट्राने पहिल्यांदाच इतर राज्यांना मागे टाकून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविला आहे. मागील वर्षी मध्यप्रदेश राज्याला हा पुरस्कार मिळाला होता. देशात इंदूर आणि सुरत या शहरांनी संयुक्त प्रथम क्रमांक पटकावला असून नवी मुंबई हे देशातील तिसरे स्वच्छ शहर ठरले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

राष्ट्रीय स्तरावरील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुरस्कारांपैकी तीन पुरस्कार राज्यातील नवी मुंबई महानगरपालिका, सासवड नगरपालिका तसेच लोणावळा नगरपालिकांना प्राप्त झाले आहेत. नवी मुंबईने देशातील सर्वात स्वच्छ शहरांत सेव्हन स्टार मानांकनासह आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. तर एक लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात सासवड देशात पहिले तर लोणावळा शहर देशात तिसऱ्या स्थानांवर आहे. या संस्थांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्त पुणे महानगरपालिका (स्वच्छतेत १० वा क्रमांक) तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका (फाईव्ह स्टार मानांकन आणि वॉटरप्लस मानांकनासह स्वच्छतेत १३ वा क्रमांक), गडहिंग्लज (२५ ते ५० हजार लोकसंख्येचे स्वच्छ शहर- पश्चिम विभाग), कराड (५० हजार ते एक लाख लोकसंख्येचे स्वच्छ शहर- पश्चिम विभाग), पाचगणी (१५ हजारांहून कमी लोकसंख्येचे स्वच्छ शहर- पश्चिम विभाग) (देशात २८ वा क्रमांक) यांना देखील राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. एक लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्वच्छतेच्या मानांकन प्राप्त प्रथम १० शहरांपैकी आठ शहरे महाराष्ट्रातील असून यामध्ये सासवड, लोणावळा, गडहिंग्लज, कराड, पाचगणी या शहरांव्यतिरिक्त विटा, देवळाली, सिल्लोड या शहरांचाही समावेश आहे.

मागील वर्षी राज्यातील केवळ नवी मुंबई या एका शहरास सेव्हन स्टार दर्जा प्राप्त झाला होता. तो दर्जा नवी मुंबईने यावर्षी देखील कायम राखला आहे. देशात केवळ तीन शहरांना सेव्हन स्टार दर्जा प्राप्त आहे. यावर्षी पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन शहरांनी फाइव्ह स्टार दर्जा मिळविला आहे. तर २८ शहरांना थ्री स्टार दर्जा प्राप्त झाला असून या गटात महाराष्ट्र देशपातळीवर प्रथम आहे. या शिवाय ८१ शहरांना वन स्टार दर्जा प्राप्त झाला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्यातील फक्त चार शहरांना वॉटर प्लस दर्जा मिळाला होता. त्यात वाढ होऊन स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये महाराष्ट्रातील २१ शहरांना वॉटर प्लस दर्जा प्राप्त झाला आहे. देशातील सर्वाधिक वॉटर प्लस शहरे आता महाराष्ट्रात  झाली आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये २०० शहरांना ओडीएफ प्लस प्लस दर्जा प्राप्त होता. स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये २६४ शहरांना ओडीएफ प्लस प्लस दर्जा प्राप्त झालेला आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० च्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० सन २०२१ ते सन २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानात शाश्वत घन कचरा व्यवस्थापन, शाश्वत स्वच्छता आणि वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापन ही उद्दिष्टे साध्य करण्यात येणार आहेत. तसेच सन २०२६ पर्यंत राज्यातील सर्व शहरे कचरा मुक्त (जीएफसी) ३ स्टार मानांकन आणि ओडीएफ प्लस प्लस, तसेच एक लक्षपेक्षा कमी लोकसंख्या असलेली ५० टक्के शहरे वॉटर प्लस करण्याचे उद्दिष्ट आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालयामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. पुरस्कार स्वीकारताना नगरविकास विभागाचे उपसचिव अनिरूद्ध जेवळीकर, स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालक नवनाथ वाठ आदी उपस्थित होते.

Previous Post

१ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; मुंबईत एमडी ड्रग्स बनवणाऱ्या फॅक्टरीचा पर्दाफाश

Next Post

‘मुंबई फेस्टीव्हल २०२४’ मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन – पर्यटनमंत्री गिरीश महाजन

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

‘मुंबई फेस्टीव्हल २०२४’ मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन – पर्यटनमंत्री गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION