खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत महिला संघाचेही सामने सुरु आहेत. या स्पर्धेत भारतीय महिला संघाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या जागतिक स्पर्धेत भारतीय महिला संघाने दक्षिण कोरिया आणि इराण या संघावर एकतर्फी विजयाची नोंद करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सलग दोन विजयामुळे गटात अव्वल स्थान मिळवले आहे. इराण विरुद्धच्या सामन्यात भारतीय महिला संघाने आपली आक्रमकता दाखवून दिली. टीम इराण संघावर १००-१६ असा एकतर्फी विजय मिळवला. भारतीय संघाने इराणची पहिली तुकडी केवळ ३३ सेकंदात गार केली. अश्विनीच्या नेतृत्वाखाली आणि मिनूने आक्रमता कायम ठेवल्यामुळे पहिल्या सत्राअखेर भारतीय महिला संघाने गुणांचे अर्धशतक नोंदवले होते.
भारतीय महिला संघाची ही चारही सत्रांमध्ये अशीच कायम राहिली. त्यातही भारतीय महिला संघाच्या पहिल्या तुकडीने तिसऱ्या सत्रात नोंदवलेल्या ६ मिनिटे ८ सेकंदाच्या अफलातून बचावामुळे भारतीय महिला संघाच्या एकतर्फी विजयाची निश्चिती झाली. निर्मलाचे कल्पक डावपेच आणि कर्णधार पुण्याची प्रियांका इंगळे यांच्या बरोबरच निर्मला भाती, नसरीन यांच्या अष्टपैलू कामगीरीमुळे भारतीय महिला संघाने विजेतेपदासाठी आपणच दावेदार असल्याचे दाखुवन दिले.







