मुंबई : HDFC बँकेने आपल्या ग्राहकांसाठी महत्वाचा अलर्ट जारी केला आहे. जर तुम्ही HDFC बँकेचे खातेधारक असाल आणि Google Pay, PhonePe, Paytm किंवा थेट UPI वापरत असाल, तर हा अपडेट नक्की लक्षात ठेवा.
बँकेच्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १२ वाजल्यापासून पहाटे १.३० वाजेपर्यंत (एकूण ९० मिनिटे) HDFC बँकेच्या UPI सेवा पूर्णपणे बंद राहतील. या काळात बँकेच्या सिस्टीमचे मेंटेनन्स व अपडेटिंग केले जाणार आहे. बँकेने सांगितले आहे की या मेंटेनन्सच्या काळात खालील सेवा प्रभावित होतील:
- UPI ट्रान्झॅक्शन: HDFC खात्यातून पैसे पाठवणे किंवा घेणे शक्य होणार नाही.
- Google Pay, PhonePe, Paytm सारख्या थर्ड-पार्टी अॅप्स: या अॅप्सवरून HDFC खात्यातून व्यवहार अयशस्वी होऊ शकतात.
- रुपे क्रेडिट कार्ड पेमेंट: रुपे क्रेडिट कार्डद्वारे होणारे काही व्यवहार पूर्ण होणार नाहीत.
- व्यापाऱ्यांचे पेमेंट: HDFC खात्याशी लिंक असलेल्या व्यापाऱ्यांना ग्राहकांकडून येणारे UPI पेमेंट स्वीकारण्यात अडचणी येऊ शकतात.
बँकेने ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना सल्ला दिला आहे की,
- महत्वाचे व्यवहार, बिल पेमेंट किंवा मनी ट्रान्सफर मेंटेनन्स सुरू होण्याआधी पूर्ण करावेत.
- रात्रीच्या वेळेत पेमेंट करायचे असल्यास पर्याय म्हणून दुसरे खाते किंवा वॉलेट वापरावे.






