• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

नवी मुंबई महापालिकेसाठी मंत्रालयातील अधिकाऱ्यांची रदबदली, उपायुक्त व्हायचंय मला!

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 28, 2023
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत रिक्त असलेल्या उपायुक्तपदावर वर्णी लागावी म्हणून सध्या प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ लागली आहे. एवढ्यावरच न थांबता मंत्रालयात कार्यरत असलेले काही अधिकारी महापालिका सेवेत कायमस्वरूपी समावेशन करून घेण्यासाठी (मर्जर) थेट मंत्रालयातून रदबदली करून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जाते. मंत्रालयातील अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अधिकारी नवी मुंबई महापालिकेच्या सेवेत उपायुक्तपदी प्रतिनियुक्तीवर नव्हे तर कायमस्वरूपी समावेशन करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच, नवी मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेले काही अधिकारीही नवी मुंबई महापालिकेत कायमस्वरूपी समावेशन करून घेण्यासाठी मंत्रालयात प्रयत्नशील आहेत. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाकरिता पदोन्नतीसाठी पात्र ठरत नसतानाही नवी मुंबई महापालिकेतील एका उपायुक्ताने पदोन्नती पदरात पाडून घेण्यासाठी आटापिटा सुरू केला आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी संबंधित उपायुक्तांकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचेही लक्ष गेले होते. काही दिवसांपूर्वी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात लाच घेतल्याप्रकरणी नोंद झालेल्या गुन्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी लाच स्वीकारल्याचे लिपिकाने जबाबात म्हटले आहे. असे असताना त्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव शीघ्रगतीने मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला पाठविलेल्या पत्रात पाच लाखांच्या लाचेसंदर्भात कोपरखैरणे पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने केवळ लोकसेवक दिनेश सोनवणे याचीच माहिती मागितल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लोकसेवकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाचा कुठेच उल्लेख न करणाऱ्या लाचलुचपत विभागाने कनिष्ठ अभियंत्याची बदली करणाऱ्या संबंधित उपायुक्ताला साधे चौकशीलाही बोलावले नसल्याचे समजते. परिणामी, संबंधित उपायुक्तांच्या पदोन्नतीच्या प्रस्तावाला मंत्रालयात पुन्हा पाय फुटले आहेत. लवकरच त्यांच्या पदोन्नतीचे आदेश निघणार असल्याचे बोलले जाते. सद्यस्थितीत उपायुक्तांच्या ११ पदांपैकी महापालिका सेवेतील दोनच महापालिका अधिकारी उपायुक्त म्हणून कार्यरत असून त्यापैकी एक उपायुक्त जून २०२३ अखेरीस तर दुसरे उपायुक्त जुलै २०२३ अखेरीस सेवानिवृत्त होत आहे. त्यानंतर नवी मुंबई महापालिका सेवेतील एकही अधिकारी पुढील १० वर्षे उपायुक्ताच्या पदोन्नतीसाठी पात्र ठरणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सद्यस्थितीत महापालिकेचे अवघे तीन अधिकारी साहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असून ते उपायुक्त पदासाठी पात्र ठरण्यापूर्वीच सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे जुलै २०२३ नंतर नवी मुंबई महापालिकेत ११ उपायुक्तपदांवर प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांचेच राज्य राहणार आहे. त्यामुळे प्रतिनियुक्तीवरील व मंत्रालयात कार्यरत असलेले काही अधिकारी नवी मुंबई महापालिकेत कायमस्वरूपी समावेशन करून घेण्यासाठी साम, दाम, दंडाचा वापर करताना दिसून येत आहेत. खरे तर त्यांचे लक्ष उपायुक्तपदावर नसून नवी मुंबई महापालिकेतील दोनपैकी एका अतिरिक्त आयुक्तपदावर आहे. त्यासाठी प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. नवी मुंबई महापालिकेत उपायुक्ताची एकूण ११ पदे मंजूर असून त्यापैकी सहा पदे महापालिका सेवेतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने भरली जाणार आहेत. तर, उर्वरित पाच पदांवर प्रतिनियुक्तीवरील अधिकारी सरकारकडून नियुक्त केले जातात. परंतु, नवी मुंबई महापालिकेतील पूर्वाश्रमीच्या उपायुक्तांनी महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना विहित वेळेत पदोन्नती न दिल्याने अनेक अधिकाऱ्यांचे साहाय्यक आयुक्त व उपायुक्त होण्याचे स्वप्न भंगले आहे. महापालिका सेवेतील अनेक अधिकारी पदोन्नतीसाठी पात्र असतानाही तत्कालीन अधिकाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे पदोन्नतीपासून वंचित राहिले व कालपरत्वे सेवानिवृत्त झाले.

Previous Post

‘या’ स्टेडियममध्ये खेळण्यासाठी आहे उत्सुक; विश्वचषकाच्या वेळापत्रकानंतर विराट कोहली नी दिली प्रतिकिया

Next Post

पहिल्याच वर्षी १२० विद्यार्थ्यांनी निवडली मराठी; ४० वर्षांनी झेवियर्स कॉलेजमध्ये मराठीचं पुनरागमन

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पहिल्याच वर्षी १२० विद्यार्थ्यांनी निवडली मराठी; ४० वर्षांनी झेवियर्स कॉलेजमध्ये मराठीचं पुनरागमन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION