मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व मुंबईचे माजी महापौर डॉ. रमेश प्रभू यांनी शिवसेनेसाठी आपले संपूर्ण जीवन वाहिले. विलेपार्लेच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
१९८७च्या विलेपार्ले पोटनिवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खारदांड्याच्या शंकर मंदिरात झालेल्या सभेत हिंदुत्वावर मते मागितल्याने १९९५ साली सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे आणि डॉ. प्रभू यांचा सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्याचा आणि मतदान करण्याचा हक्क काढून घेतला. यानंतर डॉ. प्रभू यांचे नाव हिंदुत्वाशी जोडले गेले आणि ही निवडणूक देशभर चर्चेत आली. मात्र, नंतर शिवसेनेने त्यांची अवहेलना केली, अशी खंत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अँड. आशिष शेलार यांनी पार्ल्यात व्यक्त केली. लीना प्रभू यांच्या सूचनेवरून हे पुस्तक नवीन पिढीसाठी एक महत्त्वाचा दस्ताऐवज ठरावे, तसेच मेट्रो स्टेशनला त्यांच्या वडिलांचे नाव मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मंत्री शेलार यांनी पुनरुच्चारित केले. हिंदुत्वासाठी राजकीय हुतात्मा स्वीकारलेल्या स्व. डॉ. रमेश प्रभू यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होत असल्याचा आनंद असल्याचे सांगितले. तसेच, लीना प्रभू यांनी केलेल्या मागणी प्रमाणे मेट्रो स्टेशन, हॉस्पिटल, शाळा–कॉलेज यांना डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देण्याच्या आग्रहाला, तपासे आणि उपस्थित पार्लेकरांनी जोरदार पाठिंबा दिला.







