Categories
स्पोर्ट्स

भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला ‘अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी’ नाव दिल्यानं गावस्कर भडकले

युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेला अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी असे नाव देण्यात आले. परंतु, यामुळे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली असून याबद्दल त्यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डावर निशाणा साधला. या ट्रॉफीच्या नावात सचिन तेंडुलकरच्या आधी जेम्स अँडरसनचे नाव का लावण्यात आल्याने गावस्कर नाराज झाले. हे नाव वर्णक्रमानुसार ठेवण्यात आले आहे, असा युक्तिवाद ईसीबीने केला. परंतु, गावस्कर यांनी हा युक्तिवाद फेटाळून लावला आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांना या मालिकेला अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीऐवजी तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी बोलण्याचे आवाहन केले. “ईसीबीला या मालिकेचे नाव देण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु, तेंडुलकरच्या आधी अँडरसनचे नाव का जोडले गेले? सचिन तेंडुलकर केवळ भारताचा महान क्रिकेटपटू नाही तर, अँडरसनपेक्षा १२ वर्षांनी मोठा आहेत. मैदानातील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर सचिन तेंडुलकर अँडरसनपेक्षा खूप पुढे आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि शतकांच्या बाबतीत सचिन तेंडुलकर जगात अव्वल आहे. शिवाय, एकदिवसीय क्रिकेटमध्येही सर्वाधिक धाव करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. दुसरीकडे कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अँडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे.” अँडरसन कधीही एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग नव्हता. २०१० च्या टी२० विश्वचषकात तो इंग्लंडच्या संघाचा भाग होता. परंतु, त्याला एकही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. मायदेशात अँडरसनने उल्लेखनीय कामगिरी केलीय. परंतु, परंतु परदेशी खेळपट्ट्यांवर त्याची कामगिरी तेंडुलकरइतकी प्रभावी नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published.