वृत्तसंस्था : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव मोरे सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गौरवने त्याची दीर्घकाळाची मैत्रीण प्रियांका कारेकर हिच्याशी अत्यंत साध्या पद्धतीने लग्नगाठ बांधल्याची माहिती समोर आली आहे. लग्नानंतर या जोडप्याने गौरवने मुंबईच्या पवई भागात घेतलेल्या नव्या आलिशान घरात गृहप्रवेश केला असल्याचे म्हटले जाते.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम आणि ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून घराघरात पोहोचलेल्या गौरवने नुकतेच मुंबईत स्वतःचे ‘हक्काचे घर’ घेतले आहे. विशेष म्हणजे, घराच्या गृहप्रवेशासोबतच गौरवने लग्नाची गाठ बांधत चाहत्यांना डबल सरप्राईज दिले आहे. अभिनेता गौरव मोरेच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही स्नॅप शॉट्स शेअर केलेत. ज्यामध्ये त्याचे सहकारी, मित्र मंडळी, पाहुणे आणि कलाकारांनी त्याच्या नव्या घराचे फोटो अपलोड केलेले दिसताहेत. सोबतच अभिनंदनाचा पाऊस देखील त्याच्यावर पाडला आहे. प्रत्येकाला वाटतं की आपलं एखादं घर असावं. गौरवचेही असेच एक सुंदर स्वप्न सत्यात उतरलं आहे. मुंबई एका साध्या चाळीतून सुरू झालेला हा प्रवास एका आलिशान फ्लॅटपर्यंत पोहोचला आहे. अभिनेता गौरव मोरे लग्नबंधनात अडकल्याची माहिती ऋतुजा बागवेच्या पोस्टमुळे समोर आली. तिने सोशल मीडियावर दोघांचे फोटो शेअर केले. प्रियांका कारेकर असं तिचं नाव आहे. तिच्या इन्स्टाग्राम पेजवरून कळतं की, ती आर्टिस्ट आहे. तच्या इन्स्टावर गौरवसोबतचा एक जुना फोटो देखील पाहायला मिळतो. ते एखमेकांना डेट करत असल्याचे म्हटलं जातंय.







