मुंबई : गेल्या काही दिवसापांसून विमानाचे अपघाताच्या घटना वारंवार होत आहेत. आता स्पाईज जेट विमानाचं मुंबई विमानतळावर इमरजेंसी लँडिंग करण्यात आले. हाती आलेल्या माहितीनुसार, विमान क्रमांक SG2906चे चाक हवेतच निखळलं होतं. हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई विमानतळावर एका महिला पायलटचा अचानक फोन आला. त्यानंतर त्यांनी स्पाइसजेटच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली.
त्यानंतर काही काळासाठी काही उड्डाणे थांबवण्यात आले आहे. सध्या परिस्थिती ठीक असून विमानात ७१ प्रवासी आणि दोन केबिन क्रू सर्व सुरक्षित आहेत. महिला पायलटने कॉल देऊन इमर्जन्सी लँडिंग संदर्भात माहिती दिली. त्यानंतर मुंबई विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. कांडला ते मुंबई या दिशेने उड्डाण घेत असलेल्या स्पाइसजेटच्या Q400 विमानाचे बाहेरील चाक उड्डाणानंतर धावपट्टीवर आढळले होते. तरीही विमानाने मुंबईकडे प्रवास सुरू ठेवला आणि विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. सुरळीत लँडिंगनंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले , अशी माहिती स्पाईस जेटच्या प्रवक्त्यांनी दिलीय.







