रायगड : जिल्ह्यातील बहुप्रतिक्षेत असलेल्या माजी सैनिकांची CSD कँटीन चे उद्घाटन मा.श्री. भारतशेठ गोगावले, मंत्री, रोहयो व फलोत्पादन खार भूमी विकास तसेच लेफ्टनंट जनरल डी.एस. कुशवाह AVSM,SM GOC HQ MG & G Area यांच्या शुभहस्ते शनिवार दि. ११ ऑक्टोंबर २०२५ रोजी मिलिटरी बॉयज हॉस्टल नवेनगर महाड याठिकाणी जिल्हातील असंख्य माजी सैनिक व त्यांचे परिवार यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. याप्रसंगी मंत्री गोगावले यांनी सैनिकांबद्दल सहानुभूती आणि कृतज्ञता व्यक्त करत म्हणाले सैनिकांसाठी कँटीन आणण्यामध्ये कर्नल किशोरजी मोरे यांनी अथक प्रयत्न केले. अनेक अडचणी आल्या पण त्यांनी स्थिर राहून ही कँटीन आणली, त्याबद्दल त्यांच्यासह त्यांचासोबत असणाऱ्या सैनिकांचेही कौतुक केले.
सीमेवर सैनिक तैनात आहेत त्यांच्या मुळेच आम्ही इथे सुरक्षित आहोत, त्यांच्या त्यागाला आणि बलिदानाबद्धल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्यासाठी केलेले काम हे त्यांच्या देशसेवेच्या कार्यापेक्षा अतिशय छोटे आहे. तसेच सैनिकांना मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या मिळण्यासाठी मी सदैव तयार आहे, व जर इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव आला तर मी उपमुख्यमंत्री यांना विनंती करून नगरविकास मंत्रालयाचा लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देईन. तसेच लेफ्टनंट जनरल कुशवाह यांनी आपल्या भाषणामध्ये ही कँटीन सैनिकांसाठी भरपूर सुविधा देईल आणि आता ही कँटीन तुमच्यासाठी परिपूर्ण सेवेत दाखल झाली आहे तसेच सैनिक हे उच्च अनुशासित हे सैनिकांच्या एकजुटीचा परिचय आहे असे प्रतिपादन केले. उद्घाटन प्रसंगी डेप्युटी जनरल ऑफिसर कमांडिंग ब्रिगेडियर तरुणनेश, कर्नल Q वाय के मांग्रय्या, CEO महाड श्री महेश नमाडे, सैनिक कल्याण अधिकारी ले कर्नल राहुल बैजनाथ माने, श्री चिट्टीबाबू मॅनेजर CSD डेपो खडकी यांच्यासोबत पोलादपूर महाड माणगाव मुंबई व पुण्यावरून आलेले असंख्य माजी सैनिक व त्यांचा परिवार उपस्थित होता. कर्नल किशोर जी मोरे यांनी आपल्या भाषणामध्ये मंत्री गोगावले यांचे विशेष आभार मानले. कारण जेव्हा पण काही अडचण आली की गोगावले साहेब पटकन मदतीला धावून यायचे. आर्थिक बाजू भक्कमपणे सांभाळली सर्व बाबतीत मदत केली, तसेच जनरल कुशवाह यांचे व उपस्थितांचे ही स्वागत आणि आभार व्यक्त केला कर्नल मोरे पुढे म्हणाले की, सैनिकांसाठी कँटीन सेवा सुविधा उपलब्ध करून देणे ही मोठी सुरुवात असून पुणे सब एरियातील संपूर्ण अधिकारी आणि त्यांच्या अधीन स्टाफचे देखील कौतुक केले. कँटीन आणण्यामध्ये विशेष योगदानाबद्दल कर्नल मोरे यांच्या सहकाऱ्यांचे जनरल कुशवाह यांच्या हस्ते बक्षिस देवून त्यांना सन्मानित करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या परिवारातर्फे व समाजातील सर्व स्तरावरून कर्नल किशोर मोरे याचे कौतुक केले जात आहे त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत. सैनिक फेडरेशन चे महाराष्ट्र अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर जी सावंत यांनी फोन करून कर्नल मोरे यांचे आभार व्यक्त करून म्हणाले, रायगड CSD कँटीन हा विषय अतिशय किचकट आणि अवघड होता तो आपण सोडवला तसेच तसेच सैनिक फेडरेशन चे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री सुभेदार सुभाष दरेकर यांचे मुंबईवरून मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचे ही आभार व्यक्त केले.