• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

आयुक्त भूषण गगराणी ४ फेब्रुवारीला सादर करणार महानगरपालिकेचा अर्थसंकल्प

admin by admin
February 3, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा आगामी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या ४ फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. पालिकेची मुदत संपल्यानंतर प्रशासकीय राजवटीतील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. तर आयुक्त भूषण गगराणी यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाचे आकारमान ६५ हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सन २०२५-२६ चे अर्थसंकल्‍पीय अंदाज मंगळवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात सादर करण्यात येणार आहेत. नियमानुसार आधी शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर होईल. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी हे शिक्षण खात्याचा अर्थसंकल्‍पीय अंदाज महानगरपालिका प्रशासक भूषण गगराणी यांच्यासमोर सादर करतील. त्यानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अर्थसंकल्‍पीय अंदाज सादर करतील. मुंबई महापालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प ५९ हजार ९५४ कोटी रुपयांचा सादर करण्यात आला होता. एका राज्याच्या अर्थसंकल्पाइतके या अर्थसंकल्पाचे आकारमान असते. मार्च २०२२ मध्ये पालिकेची मुदत संपल्यापासून सध्या मुंबई महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट आहे. पालिकेची निवडणूक अद्याप न झाल्यामुळे या वेळी देखील
प्रशासकीय स्तरावर अर्थसंकल्प सादर होणार आहे. प्रशासकीय राजवटीत सादर होणारा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. पालिकेच्या घटलेल्या मुदतठेवी, ‌वाढलेले खर्च यामुळे यंदाही अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व आहे. मुंबई महानगरपालिकेत सध्या प्रशासक नियुक्त असून, लोकप्रतिनिधी नसल्याने सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प देखील गेल्यावर्षीप्रमाणे केवळ प्रशासन स्तरावर सादर केला जाणार आहे.

या अर्थसंकल्पातून पालिकेच्या आर्थिक स्थितीचाही अंदाज येणार आहे. श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षांपासून खालावू लागली आहे. जकात बंद झाल्यानंतर महसूलाचे नवे मोठे स्त्रोत उभे करण्यात अपयश आले आहे. मालमत्ता कराच्या बिलांचा वाद झाल्यामुळे मालमत्ता कर वसूली ठप्प आहे. पालिकेच्या मुदतठेवीही घटल्या आहेत. त्यातच पालिकेने राखीव निधीतून विकासकामांसाठी निधी वळवण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यामुळे पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाजही या अर्थसंकल्पातून येण्याची शक्यता आहे. पालिकेची आर्थिक स्थिती कशीही असली तरी आधीच सुरू केलेल्या मोठ्या प्रकल्पांसाठी यावेळी पालिकेला भरीव तरतूद करावी लागणार आहे. सागरी किनारा मार्गाचा दुसरा टप्पा, तसेच गोरेगाव मुलुंड जोड रस्ता, समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करणे, अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी मोठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्त्पन्न वाढलेले नसले तरी भांडवली खर्चाच्या तरतुदी वाढवाव्या लागणार आहेत. त्याकरिता पुन्हा राखीव निधीलाच हात घालावा लागणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाचे आकारमान वाढणार हे निश्चित आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. गगराणी हे पालिका आयुक्तपदी आल्यानंतर त्यांना आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरात गगराणी यांनी पालिकेच्या कारभाराला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. अनेक खर्च कमी केले. तसेच प्रकल्प हे स्वावलंबी असतील या दृष्टीने नियोजन करण्याचे धोरण त्यांनी आखून दिले. प्रकल्पाचा देखभाल खर्च हा त्याच प्रकल्पातून पूर्ण होईल अशा रीतीने नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात याचेच प्रतिबिंब पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Previous Post

अंडर-१९ वूमन्स टीम इंडियाला बीसीसीआयने जाहीर केलं कोट्यवधींचं बक्षीस

Next Post

म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ४९३ घरांसाठी मार्चमध्ये सोडत; अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात

admin

admin

Next Post

म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ४९३ घरांसाठी मार्चमध्ये सोडत; अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION