• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

OTP चा गैरवापर करून गॅस सिलेंडरचा काळाबाजार; गॅस एजन्सीसह ६ जणांवर गुन्हा

admin by admin
October 26, 2026
in गुन्हेगारी, वसई-विरार
0
OTP चा गैरवापर करून गॅस सिलेंडरचा काळाबाजार; गॅस एजन्सीसह ६ जणांवर गुन्हा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

विरार : वसईमध्ये ग्राहकांच्या ओटीपीचा गैरवापर करून गॅस सिलेंडरची बनावट डिलिव्हरी दाखवत काळाबाजार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वसईतील ‘अन्नपूर्णा गॅस एजन्सी’चे मालक, व्यवस्थापक तसेच हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल)च्या विक्री व्यवस्थापकासह एकूण सहा जणांविरोधात वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, वसई न्यायालयातील तिसरे संयुक्त दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) यश काने यांच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण प्रकार समोर आला. २८ सप्टेंबर २०२६ रोजी कोणतेही बुकिंग न करता त्यांच्या नावावर एलपीजी सिलेंडर बुक झाल्याचा संदेश आणि ओटीपी प्राप्त झाला. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी तात्काळ वसई पुरवठा विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची गंभीर दखल घेत पुरवठा निरीक्षक भागवत सोनार आणि जिल्हास्तरीय तपासणी पथकाने अन्नपूर्णा गॅस एजन्सीवर छापा टाकून चौकशी सुरू केली. प्राथमिक तपासात एजन्सीमध्ये अनेक गंभीर अनियमितता आढळून आल्या. डिलिव्हरी बॉयच्या उपस्थितीची नोंद हजेरी पुस्तकात नव्हती, तर स्टॉक रजिस्टरमधील नोंदी पेन्सिलने करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे त्या नंतर बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय आवश्यक कागदपत्रांची मागणी केल्यावर एजन्सी व्यवस्थापनाकडून समाधानकारक माहिती न देता टाळाटाळ करण्यात आल्याचे तपासात समोर आले.

पुरवठा विभागाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून गेल्या सहा महिन्यांतील स्टॉक रजिस्टर, आवक-जावक नोंदी, ऑनलाइन आणि ऑफलाइन बुकिंगची माहिती तसेच प्रत्यक्ष सिलेंडर मिळालेल्या ग्राहकांच्या तपशीलांची पडताळणी केली जात आहे. या माध्यमातून किती ग्राहकांच्या नावावर बनावट डिलिव्हरी दाखवण्यात आली, किती ओटीपींचा गैरवापर झाला आणि काळाबाजाराचे जाळे नेमके किती मोठे आहे, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे. पुरवठा निरीक्षक भागवत सोनार यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन करताना सांगितले की, गॅस सिलेंडरची प्रत्यक्ष डिलिव्हरी न झालेली असतानाही बुकिंग किंवा डिलिव्हरीचा ओटीपी अथवा संदेश प्राप्त झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा प्रत्येक प्रकरणाची तात्काळ पुरवठा विभाग किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. ग्राहकांच्या सतर्कतेमुळे अशा प्रकारच्या फसवणुकीवर आळा घालणे शक्य होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे गॅस वितरण व्यवस्थेतील पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून तपास पूर्ण झाल्यानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

ईशान किशन दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्यातून OUT; युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीसाठी प्लेइंग-११ चे दरवाजे खुले!

Next Post

कोल्हापुरात २०११ पूर्वीच्या झोपड्या कायदेशीर होणार; अतिक्रमण नियमित करण्याची सुवर्णसंधी

admin

admin

Next Post
कोल्हापुरात २०११ पूर्वीच्या झोपड्या कायदेशीर होणार; अतिक्रमण नियमित करण्याची सुवर्णसंधी

कोल्हापुरात २०११ पूर्वीच्या झोपड्या कायदेशीर होणार; अतिक्रमण नियमित करण्याची सुवर्णसंधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,142)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,067)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,171)
  • मुंबई (3,567)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (564)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION