वृत्तसंस्था : कॅनडातील सरे येथील कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे. या कॅफेवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत, ज्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. गोल्डी ढिल्लन आणि कुलदीप सिद्धू यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये जबाबदारी स्वीकारली आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे, “वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह… मी, कुलवीर सिद्धू आणि गोल्डी ढिल्लन आज सरे येथील कॅप्स कॅफेमध्ये झालेल्या तीन गोळ्यांची जबाबदारी घेतो.”
पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे, “आमचे सर्वसामान्यांशी कोणतेही शत्रुत्व नाही. ज्यांच्याशी आमचे वाद आहे त्यांनी आमच्यापासून दूर राहावे. जे बेकायदेशीर (अवैध) काम करतात आणि लोकांना पैसे देत नाहीत त्यांनीही तयार राहावे. बॉलिवूडमध्ये धर्माविरुद्ध बोलणाऱ्यांनीही तयार राहावे. गोळ्या कुठूनही येऊ शकतात.” वाहेगुरु जीचा खालसा, वाहेगुरु जीचा विजय. अशी पोस्ट करण्यात आली आहे. कॅफेवर किमान तीन फेऱ्या गोळीबार करण्यात आला. यात कोणतीही जीवतहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये गोळीबारानंतरचे काही क्षण दृश्य दाखवले आहे. स्थानिक पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.






