वृत्तसंस्था : नुकताच रणवीर सिंहच्या ब्लॉकबस्टर धुरंधर या सिनेमाच्या पुढच्या पार्टचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलेच पण शिवाय त्यांची उत्सुकता देखील वाढवली. आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धुरंधर स्टारसोबत सलमान खान दिसत आहे. हा फोटो रिलीज झाल्यापासून, सलमान खान देखील या चित्रपटात दिसू शकतो असा अंदाज नेटकरी बांधत आहे.
रणवीर सिंगचा धुरंधर चित्रपट रिलीजच्या दिड महिन्यांनीही जोरदार कमाई करत आहे. चित्रपटाची क्रेझ अजूनही ओसरलेली नाही. आता, प्रेक्षक त्याच्या सिक्वेल, धुरंधर २ च्या रिलीज तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत. धुरंधर २ च्या टीझर आणि पोस्टरच्या रिलीजनंतर, धुरंधर २ शी संबंधित एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. हा फोटो समोर आल्यापासून, चित्रपटाबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे की सलमान खान देखील धुरंधर २ मध्ये एण्ट्री करू शकतो. हा फोटो पाहिल्यावर धुरंधर २ मध्ये भाईजान महत्वाची भूमिका साकारु शकतो, तो सध्या त्याचेच शूट करत असल्याचा अंदाज लोकांना लावला आहे. सलमान खानच्या या व्हायरल फोटोवर लोक उत्साहाने कमेंट करत आहेत. काहींना वाटते की हा फोटो एआय वापरून तयार करण्यात आला आहे. तर काहींना वाटते की धुरंधर २ मध्ये सलमान खान कॅमिओ करणार आहे. सध्या, सलमान खानच्या या फोटोबद्दल निर्मात्यांकडून कोणतेही अधिकृत विधान किंवा पुष्टी करण्यात आलेली नाही. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की धुरंधर २ मध्ये सलमान खान ‘बडे साहब’ च्या भूमिकेत दिसू शकतो.







