ठाणे : ठाण्याच्या घोडबंदर कडे जाणाऱ्या महामार्गावर ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आरोपी आकाश कुमार पवार याने एकतर्फी प्रेमातून नकार देणाऱ्या मृतक तरुणी प्राची विकास झाडे या महाविद्यालयीन तरुणीची सपासप वार करून हत्या केल्याची घटना ४ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. सदर प्रकरण अंतिम सुनावणीसाठी ठाणे सेशन न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.बी. अग्रवाल यांच्या दालनात सुरु होती. सरकारी वकील ए.पी.लाडवंजारी यांनी तब्बल २१ साक्षीदार तपासले. नौपाडा पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात सादर केल्याने न्यायमूर्ती अग्रवाल यांनी आरोपी आकाश पवार याला दोषी ठरवीत अजन्म कारावासाची शिक्षा आणि ५० हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी वकील दरम्यानसिंग बिष्ट यांनी विशेष मार्गदर्शन व सहकार्य केल्याचे मृतकाचे वडील विकास झाडे यांनी सांगितले.
एकतर्फी प्रेमप्रकरणातून घडलेल्या हत्येचा थरार ४ ऑगस्ट, २०१८ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला. ठाणे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मृतक प्राची झाडे हिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा आरोपी आकाश पवार याच्या प्रेम प्रस्तावाला मृतक प्राचीने नकार दिला. दरम्यान याचा राग अनावर झालेल्या आरोपी आकाश पवार याने मात्र काटा काढण्याचा निश्चय केला. घटनेच्या दिवशी मुंबई कडून घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या पूर्वद्रुती महामार्गावर ठाणे आरटीओ समोरील महामार्गावर मृतक प्राची हिला आरोपी आकाश ने गाठले. तिच्याशी तो वाद घालू लागला. मृतक तरुणीने पुन्हा नकार दिल्याने आकाश याने जवळच्या कोयत्याने मृतक प्राची हिच्यावर सपासप १३ वार केले. यात तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी आकाश पवार याला पोलिसांनी ५ ऑगस्ट, २०१८ रोजी अटक केली. त्याच्या विरोधात ठाणे सेशन न्यायालयात ३१ ऑक्टोबर, २०१८ रोजी नौपाडा पोलिसांनी शवविच्छेदन आवाहल, साक्षीदार यांचे जबाब, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, नोंदवून न्यायालयात आरोप पत्र सादर करण्यात आले. सदर प्रकरणात सरकारच्या वतीने ए.पी. लाडवंजारी यांनी न्यायालयात बाजू मांडताना भक्कम पुरावे, २१ साक्षीदार यांच्या जबाबासह पोलिसांनी मिळवलेल्या सीसीटीव्ही पुटेज आणि साक्षीदारांचे जबाब नोंदविले. तर यात आरोपी आकाश पवार याने ही विसेष जबाब नोंदविल्याने न्यायमूर्ती ए.बी. अग्रवाल यांनी दोषी ठरवीत आकाश पवार याला दोषी ठरवीत न्यायालयात सरकारी वकिलांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य धरीत आरोपी आकाश पवार याला आजीवन कारावासाची शिक्षा आणि ५० हजाराचा दंड अशी शिक्षा १२ डिसेंबर, २०२४ रोजी ठोठावली. न्यायमूर्तीनी निकालात दंडाची ५० हजार रुपये न भरल्यास आरोपीला एक वर्षाची अतिरिक्त कैद भोगावी लागणार असल्याचे नमूद केले.





