• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

काळाचौकीत प्रियकराच्या हल्ल्यात तरुणीचा करुण अंत

admin by admin
October 27, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : काळाचौकी परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीवर जीवघेणा हल्ला करून स्वतःचाही जीव घेतल्याची ही भयावह घटना आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचं नाव सोनू बरई असून तरुणीचं नाव मनिषा यादव आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, मात्र अलीकडेच त्यांचं नातं तुटलं होतं. सुमारे आठ ते दहा दिवसांपूर्वी दोघांमध्ये तीव्र वाद झाल्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला होता. मात्र सोनू याला हे नातं संपवणं मान्य नव्हतं. तो सतत मनिषावर संशय घेत असे. या संशयातूनच त्यांच्यात सतत वाद होत होते.

शेवटची एकदा भेट घेण्यासाठी त्याने मनिषाला काळाचौकी परिसरात बोलावलं. सुरुवातीला दोघांमध्ये संभाषण झालं, पण नंतर वाद चिघळला आणि संतापाच्या भरात सोनूने स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या चाकूनं मनिषावर वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मनिषा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जवळच्या एका नर्सिंग होममध्ये धाव घेतली. मात्र संतप्त सोनू तिच्या मागोमाग तिथे गेला आणि पुन्हा तिच्यावर वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर सोनूने स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या मनिषाला तात्काळ जवळच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तिच्या उपचारासाठी प्रयत्न सुरू केले, परंतु दुर्दैवाने तीन तासांच्या आतच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या निधनानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. काळाचौकीसारख्या गजबजलेल्या भागात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठवले. प्राथमिक तपासात पोलिसांना दोघांमधील तणाव आणि संशयामुळेच हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. सोनूचा राग आणि मालकी हक्काची भावना यामुळेच हा अत्यंत टोकाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत असून, दोघांच्या कुटुंबीयांचीही चौकशी सुरू आहे. एकूणच, या घटनेनं पुन्हा एकदा प्रेमातून जन्मलेल्या संशयाच्या आणि आक्रमकतेच्या परिणामाची भीषण आठवण करून दिली आहे.

Previous Post

आता लालपरीचे लोकेशन कळणार एका क्लिकवर!

Next Post

लाडकी बहीण योजनेत पुरुषांची ‘एंट्री’; सरकारला तब्बल २४ कोटींचा बसला फटका

admin

admin

Next Post

लाडकी बहीण योजनेत पुरुषांची ‘एंट्री’; सरकारला तब्बल २४ कोटींचा बसला फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION