• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

‘नवशिक्या’ भाईंना आता भाईगिरीची चटक पडणार महागात; पिंपरी पोलिसांचा मास्टरप्लॅन

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 1, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पिंपरी : एकही गुन्हा नावावर नसला, तरी गुन्हेगारी मानसिकता असणे, रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या सानिध्यात राहणे, गुन्हेगारांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणे अशा गोष्टी करीत भविष्यात भाईगिरीची स्वप्ने रंगविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस शहरात वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी आणि संबंधितांना ताळ्यावर आणण्यासाठी पिंपरी पोलिसांनी कंबर कसली असून, भविष्यात गुन्हेगारीचा मार्ग चोखाळणाऱ्या संभाव्य भाईंची ‘कुंडली’ तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याशिवाय अनेक ‘नवशिक्या’ भाईंना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना समज देण्यावरही भर देण्यात येत आहे. पोलिसांनी उचलेल्या या पावलामुळे शहरातील या ‘मुन्नाभाईं’ची पाचावर धारण बसली आहे. शहरात पोलिस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर सर्व पोलिस ठाण्यांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असणाऱ्यांची एक यादी तयार करण्यात आली होती. त्यातून शहरातील एक हजार ५१३ आरोपींची माहिती समोर आली.

पूर्वीच्या रेकॉर्डनुसार संघटित टोळ्यांची संपूर्ण माहिती पोलिसांकडे तयार आहे. मात्र, त्यातील अनेक जण मरण पावले आहेत. अनेकांचे केवळ रेकॉर्ड असून, मागील सहा ते सात वर्षांत त्यांचा गुन्हेगारी घटनांशी संबंध राहिला नसल्याचीही नोंद पोलिसांच्या दफ्तरी आहे. असे असले, तरी शहरातील अनेक गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढल्याचे आढळून येत आहे. त्याचबरोबर पूर्वीचे कोणतेही रेकॉर्ड नसलेल्यांचा गंभीर गुन्ह्यांत सहभाग असल्याचे उघड झाले आहे. शहरात एखादा गुन्हा घडल्यानंतर तपास करताना भलत्याच लोकांची नावे समोर येत आहेत. त्यामुळे आता गुन्हेगारी मानसिकता असणारे, रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या सानिध्यात असणारे आणि गुन्हेगारांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मदत करणाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहेत. गेल्या पाच वर्षांत दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्यांची संख्या एक हजार ५२३वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर एकही गुन्हा नसणारे, गुन्हेगारी मानसिकता असणाऱ्या ‘उदयोन्मुख’ गुन्हेगारांची संख्या साडेसात हजारांपर्यंत असणाऱ्यांची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
सध्या सोशल मीडियावर भाईगिरीचे प्रदर्शन करण्याचे पेव फुटले आहे. इन्स्टाग्राम, फेसबुकवर हातात शस्त्र घेऊन किंवा धमकीचे रील्स बनवून आपण भाईगिरी करीत असल्याचे मिरवण्याचे प्रकार वाढले आहेत. गुन्हे शाखेकडून अशांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात करण्यात आली. या ‘उदयोन्मुख’ गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलावून पोलिसी भाषेत समज देण्याचे काम सुरू झाले आहे.

शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखली जावी या उद्देशाने गुन्हेगारांची यादी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पारंपारिक माहिती संकलनाबरोबरीनेच आता नव्या पद्धतीनेही माहिती अद्ययावत केली जात आहे. शहरात संघटित गुन्हेगारी आणि नागरिकांना त्रास होणाऱ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घटनांना आळा बसावा, म्हणून वरिष्ठांनी यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.- सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा, पिंपरी-चिंचवड

Previous Post

समृद्धी महामार्गावरील अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने तात्काळ सुरक्षितता उपाययोजना करावी – अजित पवार

Next Post

आजपासून होणार १० टक्के पाणीकपात जोरदार; पावसानंतरही मुंबईत पाणी बाणी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आजपासून होणार १० टक्के पाणीकपात जोरदार; पावसानंतरही मुंबईत पाणी बाणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION