मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या दगडी चाळीत लगबग सुरू आहे. अरुण गवळी उर्फ डॅडी सक्रिय राजकारणात उतरणार नसले तरी त्यांच्या दोन्ही कन्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत असून माजी नगरसेविका गीता गवळी आणि योगिता अरूण गवळी यांनी भरला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे.
मुंबई महानगरपालिका या तोंडावर असून सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. अरुण गवळींची अखिल भारतीय सेना देखील तयारीत आहे. काही महिन्यांपूर्वी अखिल भारतीय सेनेच्या आणि अरूण गवळीच्या भावजई वंदना गवळी यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ती जागा आता अरुण गवळींची मुलगी योगिता लढणार आहे. योगिता गवळी हिने आपली काकी वंदना गवळी यांच्या विरोधात २०७ मधून अर्ज भरला आहे. भायखळ्यातील २१२ आणि २०७ या दोन वाॅर्डांवर अरुण गवळीचे वर्चस्व आहे. गवळीची मुलगी गीता आणि भावजई वंदना येथून विनासायास निवडून यायच्या. गवळी यांच्या अखिल भारतीय सेना या पक्षाच्या विरोधात शिवसेना उमेदवार देत नसे, मात्र यंदा सगळीच गणिते बदलली असून आगामी निवडणुकीत शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे. त्यामुळे ते इथे उमेदवार देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.







