वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीग या जगप्रसिद्ध टी २० लीगला येत्या काही महिन्यात सुरुवात होणार आहे. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सर्व फ्रेंचायझींना आगामी सीजनसाठीच्या मिनी ऑक्शनपूर्वी त्यांच्या संघातील रिटेन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट जाहीर करायची आहे. मात्र सध्या एक माहिती समोर आली असून यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते फार नाराज होऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार मुंबई इंडियन्सला तब्बल ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकवून देणारा कर्णधार रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सची साथ सोडू शकतो.
सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिलीज करू शकते. तर काही फ्रेंचायझी या रोहितला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या ही चर्चा होण्याचं कारण अभिषेक नायर आहे. रोहित शर्माचा जवळचा मित्र अभिषेक नायर हा कोलकाता नाईट रायडर्सचा हेड कोच बनणार आहे. लवकरच फ्रेंचायझी या संदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यानंतर असं म्हटलं जातंय की रोहित शर्मा हा केकेआर सोबत पुढील सीजनमध्ये खेळताना दिसू शकतो. रोहित शर्मा हा मागील अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्समधून खेळतोय मागील दोन वर्ष सोडती तर त्यापूर्वी त्याने संघाचं नेतृत्व केलं होतं. कोलकाता नाईट रायडर्सला सध्या नेतृत्वाची गरज आहे. परंतु मुंबई इंडियन्स रोहितला रिलीज करण्यापूर्वी बऱ्याच गोष्टींबाबत विचार करेल. कारण यापूर्वी आयपीएल 2024 मध्ये त्यांनी रोहितला बाजूला करून हार्दिक पंड्याला कर्णधार केलं होतं त्यावेळी मुंबई इंडियन्सला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला समोर जावं लागलं होतं. रोहित शर्मा मागील अनेक वर्ष मुंबईसाठी खेळत असल्याने त्याचं तेथील स्थान कायम आहे. पण कोलकाता नाईट रायडर्समध्ये आल्यास त्याला पुन्हा संघात आपलं नवं स्थान मिळवावं लागेल.







