मिरारोड : सध्याच्या ए आयच्या दुनियेत दुनिया हायटेक झाली आहे.परंतु,त्यापेक्षाही चोरी करणारे पुढे असल्याचे दिसत आहे. कारण एका प्रकरणात ऑनलाइन पैसे चोरून फसवणूक करणार्याण दोन शातीर चोरांना भाईंदर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या चोरांची योजना देखील कमालीची होती. या प्रकरणात अधिक दोन आरोपी निष्पन्न झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.लवकरच त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींकडून २८ महागडे मोबाईल फोन, ४ लाख रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ऑनलाईन मोबाईल फोन खरेदी केला नसताना देखील आमच्या बँक खात्यातून पैसे कापण्यात आले आहेत, अशा प्रकारची तक्रार भाईंदर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
संबंधित तक्रारदार यांनी बुक न केलेल्या चार फोनची डिलिव्हरी भाईंदर येथे एका व्यक्तीने रस्त्यावर घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर परिमंडळ-१ चे उपायुक्त राहुल चव्हाण यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. या फसवणुकीत CRED.Apk, MParivahan Fake UI.Apk, Adult Chat.Apk या बोगस लिंक नागरिकांना पाठवून मोबाईल हॅक करून ओ.टी.पी. मिळवून मोबाईल खरेदी केला जायचा. त्यानंतर तो अन्य लोकांना विक्री केला जायचा.तशी माहिती पोलिसांनी दिली आहे.या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात कलम ३१८ (४) ३ (५) सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७ (सी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात आरोपी हे नागरिकांचा वाहन क्रमांक व मोबाईल क्रमांक प्राप्त करून अॅोप लिंकव्दारे मोबाईल हॅक करायचे.त्यानंतर कॉल फॉरवर्डिंग , SMS फॉरवर्डिंग , view SMS, सेंड SMS, UPI Pin Grabber, View Logged-in Gmail, Contact List Access, Call Log Access, Secure login+ Change पासवर्ड कॉल, अशा फिचर्सचा अॅलक्सेस घेऊन नागरिकांच्या बँक अकाऊंटची माहिती व ओटीपी मिळवायचे.त्यानंतर नागरिकांच्या अकाऊंटमधून ऑनलाईन पैसे ई कॉमर्स कंपनीला वळते करून महागडे मोबाईल फोन खरेदी करत होते. ते मोबाईल फोन अन्य नागरिकांना विक्री करून त्यांची देखील फसवणूक करण्यात येत होती.







