नाशिक : फेसबुकवर व्यवसायाचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात तणावात आणि नैराश्यात असलेल्या व्यक्तीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव प्रशांत पाटील असेल आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रशांत पाटील यांच्या पत्नी हर्षाली यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या पतीने फेसबुकवर https://www.facebook. com/padma.v.chikte या लिंकवरून संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या सांगण्यावरून हापको ऑइलचा व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे गुंतवले होते. या संधार्बत संबंधिताने मेल आयडी padmavchikte@gmail.com व मोबाईल क्रमांक ९१५६०९७८०५ चा वापर केला आहे. प्रशांत पाटील आणि त्यांचे मित्र राजेश जीवन जाधव, हरिश्चंद्र पांडू भरसठ व मोहित संदीप एखंडे यांनी मिळून डिसेंबर २०२३ ते ६ जून २०२५ या दरम्यान कालावधीत एकूण ५५ लाख ७९ हजार ३०० रुपयांनी रक्कम विविध विविध बँक खात्यांमध्ये जमा केली. पैसे परत न मिळाल्याने आणि संपूर्ण रक्कम कर्जावर घेतल्याने आर्थिक तणावात आलेल्या प्रशांत पाटील यांनी आत्महत्या केली. यांनतर त्यांच्या पत्नीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.







