महाराष्ट्र : महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ला आता जवळपास एक वर्ष झाले. गेल्या वर्षभरात लाखो महिलांच्या खात्यावर या योजनेचे पैसेही जमा झाले.2024 मध्ये महाराष्ट्रात ही योजना मोठ्या धुमधडाक्यात लागू करण्यात आली होती. पण गेल्या चार-पाच महिन्यांपासून या योजनेतील नियमांत बदल करण्यात आले. त्यानंतर योजनेतून अनेक महिलांची नावे वगळण्यात आली. सुरूवातीला सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळत गेला. मात्र आता या योजनेत केलेल्या बदलांमुळे अनेक महिलांची नावे काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे जून महिन्याचा हप्ता अद्यापही अनेक लाभार्थींच्या खात्यात जमा झालेला नाही, यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सध्या सरकारकडून पात्र व अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे. या प्रक्रियेनंतर अनेक महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. जर तुमच्या खात्यातही जून महिन्याचा हप्ता आलेला नसेल, तर तुमचे नाव यादीतून वगळण्यात आले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचं नाव अजूनही यादीत आहे की नाही, हे तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
यादीत नाव कसे तपासायचे?
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- ‘अंतिम यादी’ (Final List) विभागात क्लिक करा.
- तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड भरून सबमिट करा.
- मोबाईलवर आलेला ओटीपी कोड टाका.
- तुमच्या स्क्रीनवर लाभार्थी यादी दिसेल.
- त्यात तुमचं नाव आहे की नाही, हे तपासा.
महिलांची नावे वगळण्यामागचं कारण काय?
- सुरुवातीला या योजनेसाठी पात्रतेचे निकष खूप शिथिल होते, त्यामुळे लाखो महिलांनी अर्ज केला. मात्र, युती सरकार आल्यावर पात्रतेसंदर्भात नव्याने नियम ठरवण्यात आले.
- सरकारी नोकरीत असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.






