पुणे : पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर येथील गल्ली नंबर ४ येथे अवैधरीत्या व बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करून मिळतो. अशी बातमी मिळताच मार्केटयार्ड पोलीस स्टेशन चे अधिकारी अंमलदार व दोन पंचासह आंबेडकर नगर गल्ली नंबर ४ येथील दावल एंटरप्राइजेस या दुकानांमध्ये व त्याच्या मागील घरामध्ये बेकायदेशीरपणे घरगुती वापराचे मोठ्या गॅस सिलेंडर मधून लहान गॅस सिलेंडर मध्ये निष्काळजी पणे, गॅस रिफिलिंग करून देण्याचे काम बेकायदेशीरपणे चालू होते. सदर ठिकाणची अधिक पाहणी केली असता त्या ठिकाणी गॅस रिफिलिंग साठी लागणारे सर्व सामान पोलिसांना मिळून आले. सदरील ठिकाणी छापा टाकून पोलिसांकडून पंचनामा करण्यात आलेला असून BNS कलम २८७, २८८ सह जीवनावश्यक वस्तू कायदा कलम १९५५ कलम ३ व ७ अन्वये गु. रजि.नंबर २०/२५ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात आरोपीत बंदी नवाज उर्फ सलीम गुलाब शेरीकर वय ३५ राहणार आंबेडकर गल्ली नंबर ४ याला अटक करण्यात आली.
सदर कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या पथकाने केली.





