मुंबई : लहान मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी ६० वर्षीय व्यक्तीला अटक केली. आरोपी पीडित मुलीचा काका आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पीडित मुलगी झोपली असताना आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पीडित मुलीला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून पोलिसंनी बलात्कार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी पथक पाठवून आरोपी राहत असलेल्या घरातून त्याला अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.







