• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

२०.८४ कोटींची विनातिकीट प्रवाशांना पकडून दंडवसुली

एप्रिल २०२३ च्या तुलनेत दंडाच्या रकमेत २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 8, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : लोकल, रेल्वेगाड्यामधून विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढल्याने, तिकीटधारक प्रवाशांची डोकेदुखी वाढू लागली. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेकडून वारंवार तक्रार केल्यानंतर, विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी विविध मोहिमा राबवून एप्रिल २०२४ मध्ये २.९४ लाख विनातिकीट प्रवाशांना पकडून २०.८४ कोटींची दंडवसुली करण्यात आली. एप्रिल २०२३ च्या तुलनेत दंडाच्या रकमेत २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पश्चिम रेल्वेवरील सर्व प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी मुंबई लोकल सेवा, मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेन्स आणि विशेष रेल्वेगाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम सातत्याने राबवली जात आहे. तिकीट नसलेल्या प्रवाशांना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने एप्रिल २०२४ मध्ये अनेक तिकीट तपासणी मोहिमा राबविल्या. त्यातून १,६३,८१९ विनातिकीट प्रवाशांना पकडून २०.८४ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला. यामधील मुंबई उपनगर विभागातून ५.५७ कोटी रुपयांचा समावेश आहे.

एप्रिल २०२४ मध्ये आरक्षित न केलेल्या सामानासह २.९४ लाख विनातिकीट, अनियमित प्रवाशांना पकडून २०.८४ कोटी रुपये वसूल करण्यात आले. याशिवाय एप्रिल महिन्यात पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात ९८ हजार प्रकरणे शोधून ५.५७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी भरारी पथकाद्वारे तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमांद्वारे एप्रिल २०२४ मध्ये ४ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवाशांना दंड आकारण्यात आला. तसेच, त्यांच्याकडून १३.७१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त पश्चिम रेल्वेने ‘बॅटमन २.०’ तिकीट तपासणी मोहीम आयोजित केली होती. याद्वारे रात्रीच्या वेळी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यात आले. याद्वारे ३-४ मे च्या आणि ४-५ मे च्या रात्री विनातिकीट प्रवाशांना पकडून ३.४० लाख रुपयांची दंडवसुली केली. योग्य आणि वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले.

                                       एप्रिल २०२३                             एप्रिल २०२४

विनातिकीट प्रवासी              २.४६ लाख                                २.९४ लाख

दंडवसुली                          १६.७६ कोटी                              २०.८४ कोटी

मुंबई उपनगरीय विभाग ८३,५२२ प्रकरणे ९८ हजार प्रकरणे

दंडवसुली                         ४.७१ कोटी             ५.५७ कोटी

एसी लोकलमधील विनातिकीट ६,३०० प्रकरणे ४ हजार प्रकरणे

दंडवसुली                         २१.३४ लाख             १३.७१ लाख

Previous Post

निवडणुकीदरम्यान मुंबई उपनगरात २० कोटींची रोकड अन् ५६ हजार लिटर दारु जप्त

Next Post

स्थलांतरित होण्यासाठी रहिवाशांना नोटिसा; १८८ इमारती मुंबईमध्ये अतिधोकादायक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

स्थलांतरित होण्यासाठी रहिवाशांना नोटिसा; १८८ इमारती मुंबईमध्ये अतिधोकादायक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,147)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (503)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (89)
  • पालघर (77)
  • पालघर (51)
  • पुणे (1,075)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,216)
  • मुंबई (3,595)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (570)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (216)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION